(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Update Today : दिलासादायक! देशात वर्षभरातील सर्वात कमी सक्रिय कोरोनारुग्णांची नोंद, जाणून घ्या देशाची आकडेवारी
India Coronavirus Update : जगभरात 27.50 कोटींहून अधिक आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 3.47 कोटी लोक भारतातील आहेत.
India Coronavirus Updates : भारतात (India) सध्या कोरोनाचे 82 हजार 267 सक्रिय रुग्ण आहेत, ही 572 दिवसांतील सर्वात सक्रिय रुग्णांची नोंद आहे. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6 हजार 563 नवीन रुग्ण आढळले असून 132 लोकांचा या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर, 8077 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. म्हणजेच 1 हजार 646 सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. मात्र दुसरीकडे देशातील कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे संकट वाढत आहे. आतापर्यंत देशात ओमायक्रॉनचे 159 रुग्ण आढळले आहेत.
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 47 लाख 46 हजार 838 जणांना लागण झाली आहे. त्यापैकी 4 लाख 77 हजार 554 लोकांचा मृत्यू झाला आहे. चांगली बाब म्हणजे आतापर्यंत तीन कोटी 41 लाख 87 हजार लोक बरे झाले आहेत.
- भारतातील एकूण कोरोना रुग्ण : 3 कोटी 47 लाख 46 हजार 838
- सक्रिय प्रकरणे: 82 हजार 267
- एकूण वसुली : 3 कोटी 41 लाख 87 हजार 017
- एकूण मृ त्यूः 4 लाख 77 हजार 554
- एकूण लसीकरण : 137 कोटी 67 लाख 20 हजार 359
आतापर्यंत 137 कोटी लसीचे डोस देण्यात आले
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 19 डिसेंबरपर्यंत देशभरात कोरोना लसीचे 137 कोटी 67 लाख 20 हजार डोस देण्यात आले आहेत. शेवटच्या दिवशी 15.82 लाख डोस देण्यात आले. दरम्यान, इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, आतापर्यंत सुमारे 66.51 कोटी कोरोना चाचण्या झाल्याचे सांगितले आहे. शेवटच्या दिवशी 8.77 लाख कोरोना नमुन्याच्या चाचण्या करण्यात आल्या, ज्यांचा पॉझिटिव्हीटी दर 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.37 टक्के आहे, तर बरे होण्याचे प्रमाण 98.39 टक्के आहे. सक्रिय प्रकरणे 0.24 टक्के आहेत. कोरोना अॅक्टिव्ह केसेसच्या बाबतीत भारत आता जगात 28 व्या क्रमांकावर आहे. एकूण संक्रमित संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron : सावधान! देशात दोन नवे ओमायक्रॉनग्रस्त, रुग्णांचा आकडा 159वर
- Omicron : धोक्याची घंटा! संकटाचा सामना करण्यास तयार राहा - AIIMS संचालक रणदीप गुलेरिया
- The Kashmir Files : 'द काश्मीर फाईल्स'चे पोस्टर प्रदर्शित, काश्मिरी पंडितांच्या संघर्षाची कहाणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha