एक्स्प्लोर
Advertisement
बाबरी जमीन खटल्यातील पक्षकार हाशिम अन्सारी यांचं निधन
लखनौ : अयोध्येतल्या बाबरी मशिद-रामजन्मभूमी वादाच्या खटल्यातील पक्षकारांपैकी एक असलेल्या हाशिम अन्सारी यांचं निधन झालं. ते 96 वर्षांचे होते. फैजाबादमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हाशिम अन्सारी यांचे पुत्र इक्बाल अन्सारी यांच्या माहितीनुसार, "अन्सारी बुधवारी सकाळी नमाजसाठी उठले नाहीत. त्यानंतर समजलं की त्यांचा मृत्यू झाला आहे."
हाशिम अन्सारी 60 वर्षांहून अधिक काळ बाबरी मशिदीसाठी कायदेशीर लढाई लढत होते. परंतु तरीही अन्सारी यांचे स्थानिक हिंदू साधू-संतांसोबतचे संबंध कधीही बिघडले नाहीत. अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा वाद 1949 पासून सुरु आहे.
इतकंच नाही तर हाशिम अन्सारी यांनी हा वादग्रस्त खटला न लढवण्याचा निर्णय घेतला होता. या मुद्यावरुन राजकारण होत असल्याने आपण आता हा खटला लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं.
दरम्यान, हाशिम यांच्या निधनानंतर आता मुस्लीम पक्षाकडून अयोध्या प्रकरणाचा खटला त्यांचे पुत्र लढवणार आहेत. हाशिम यांनीच हा निर्णय घेतला होता.
संबंधित बातम्या
अयोध्येतील रामाला मंदिरात बसलेलं पाहायचंय; बाबरी मस्जिद खटल्यातील पक्षकाराचा निर्णय
अयोध्या वाद मिटवण्याच्या हालचाली, मंदिरासह मशीद बांधण्याचा फॉर्म्युला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement