Chhattisgarh food officer suspended: अधिकाऱ्याच्या मोबाईलसाठी कालव्यातून लाखो लीटर पाणी उपसले; वाचा नेमकं काय घडलं?
Chhattisgarh food officer suspended: छत्तीसगढच्या एका सरकारी अधिकाऱ्याचा मोबाईल एका कालव्यात पडला. त्यानंतर त्या मोबाईलसाठी संपूर्ण कालवा रिकामा करण्यात आला. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेल्याचं चित्र पाहायला मिळालं.
Chhattisgarh food officer suspended: छत्तीसगढमधून (Chhattisgarh) एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. एका सरकारी अधिकाऱ्यामुळे संपूर्ण कालवा रिकामं करण्यात आला असून त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेल्याचं चित्र छत्तीसगढमध्ये पाहायला मिळालं आहे. अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी राजेश विश्वास हे छत्तीसगढच्या कांकेर जिल्ह्यामध्ये गेले असताना त्यांचा फोन एका कालव्यात पडला. त्यानंतर त्यांचा मोबाईल शोधण्यासाठी संपूर्ण कालवा रिकामा केला. त्यामुळे जवळपास 41 लाख लीटर पाणी वाया गेल्याचं सांगितलं जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे राजेश हे कोणत्या कामासाठी नाही तर सुट्ट्यांसाठी या जिल्ह्यात गेले होते. त्यावेळेस त्यांचा मोबाईल पाण्यात पडला. त्यानंतर तो फोन शोधण्यासाठी संपूर्ण कालवा रिकामी करण्यात आलं. तसेच 'या फोनमध्ये महत्त्वपूर्ण माहिती असल्याने हा मोबाईल शोधणं गरजेचे होतं' असं या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
सेल्फीच्या नादात पाणी गेलं वाया
सेल्फी काढताना राजेश यांच्या हातातून त्यांचा फोन जवळील कालव्यात पडला. राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'त्यांचा फोन एका ज्या कालव्यात पडला त्यामधील पाणी वापरण्या योग्य नव्हते.' परंतु या कालव्यातील पाणी सोमवार संध्याकाळपासून उपसण्यास सुरुवात झाली ते गुरुवारपर्यंत या कालव्यातील पाणी काढले जात होते. या प्रकाराची माहिती पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सुरु असलेला प्रकार तात्काळ थांबण्याचे निर्देश दिले. त्यानंतर या सगळ्या प्रकाराची राजेश यांना चांगलीच किंमत चुकवावी लागली. जिल्हाधिकारी प्रियांका शुल्का यांनी राजेश यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली. तसेच 'त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला असून यासंबंधी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी देखील नाही' असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं.
परंतु या मोबाईलमध्ये महत्त्वपूर्ण अशी सरकारी माहिती असल्याचा दावा राजेश यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच हा कालवा रिकामा करण्याची त्यांनी तोंडी परवानगी मागितल्याचं देखील त्यांनी सांगितलं. परंतु राजेश यांनी क्षमतेपेक्षा जास्त पाणी कालव्यातून बाहेर काढलं. पण ज्यासाठी हा सगळा प्रकार करण्यात आला तो मोबाईल मात्र बराच काळ पाण्यात राहिल्याने बंद पडला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकारामुळे काहीच साध्य झाले नसून पाणी मात्र भरपूर प्रमाणात वाया गेल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.
#Chhattisgarh के अंतागढ़ में फूड इंस्पेक्टर ने अपना मोबाइल खोजने के लिए बहा दिया परलकोट जलाशय का 21 लाख लीटर पानी!
— कुलदीप नागेश्वर पवार Kuldeep Nageshwar Pawar (@kuldipnpawar) May 26, 2023
फोन मिल गया फूड इंस्पेक्टर का कहना है - उन्होनें कुछ गलत नहीं किया, वहीं मंत्री @amarjeetcg कार्रवाई की बात कह रहे है।@ZeeMPCG @mohitsinha75 @RupeshGuptaReal pic.twitter.com/c0qcPpOUrd