एक्स्प्लोर

पत्नी गाडीत बसल्याचं समजून पती निघाला, महिलेवर गँगरेप

पत्नी गाडीत बसल्याचं समजून पती पुढे निघून गेला आणि महिला रस्त्यावर एकटीच राहिली. याचा गैरफायदा घेत सहा जणांनी विवाहितेवर गँगरेप केला.

भुवनेश्वर : 30 वर्षीय विवाहितेवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना ओदिशामध्ये घडली आहे. पत्नी गाडीत बसल्याचं समजून पती पुढे निघून गेला आणि महिला रस्त्यावर एकटीच राहिली. याचा गैरफायदा घेत सहा जणांनी विवाहितेवर गँगरेप केला. ओदिशातील अनुगुल जिल्ह्यात गुरुवारी रात्री ही घटना घडली. गुरुवारपासून बेपत्ता असलेली महिला रविवारी संध्याकाळी दीडशे किलोमीटर दूर असलेल्या जगतसिंगपूर जिल्ह्यात सापडली. दोन दिवस ठावठिकाणा न लागल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली गेली होती. पीडित महिलेची जबानी अद्याप नोंदवण्यात आली नसली, तरी सामूहिक बलात्कारापूर्वी घडलेल्या घटनांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. संबळपूर जिल्ह्यात राहणारं संबंधित दाम्पत्य गाडीने मुलीसह कटकच्या दिशेने निघालं होतं. पती गाडी चालवत होता, सहा वर्षांची मुलगी त्याच्या शेजारी बसली होती, तर पत्नी मागे बसली होती. अनुगुल जिल्ह्यात नक्ची गावाजवळ असताना रात्री दहा वाजताच्या सुमारास पत्नीने पतीला गाडी थांबवण्यास सांगितलं. लघुशंका करण्यासाठी महिला गाडीतून खाली उतरली. हात धुण्यासाठी पाणी घ्यायला ती पुन्हा गाडीजवळ आली, पाण्याची बॉटल काढून तिने दरवाजा लावला आणि पुन्हा आडोशाला गेली. मात्र दरवाजाचा आवाज ऐकून पत्नी गाडीत बसली असा समज पतीने केला, आणि त्याने गाडी सुरु केली. आपली पत्नी मागे बसलेली नाही, हे त्याला जवळपास 17 किमीपर्यंत ध्यानातही आलं नाही. बोईंडाजवळ मुलीला चॉकलेट घेण्यासाठी तो खाली उतरला. दुकानातून परत आल्यावर मागे बायको नसल्याचं त्याला लक्षात आलं. मात्र नुकतीच ती कुठेतरी उतरली असेल, असं त्याला वाटलं. बराच वेळ पत्नी न आल्यामुळे तो घाबराघुबरा झाला आणि त्याने मार्केटमध्ये पत्नीची शोधाशोध सुरु केली. नक्ची परिसरात असताना शेवटचं पत्नीशी बोलल्याचं त्याच्या लक्षात आलं, त्यामुळे तो तात्काळ नक्चीला गेला. तिथेही तिचा शोध न लागल्यामुळे त्याने पुन्हा बोईंडा गाठलं. अखेर हडपा पोलिसात त्याने तक्रार दाखल केली. पोलिसांना तीन दिवस पत्नीचा शोध घेता आला नाही. पीडित महिला राष्ट्रीय महामार्गावरुन एकटी चालत असताना सहा जणांनी तिला रिक्षात बसवलं अशी माहिती अनुगुल पोलिसांना मिळाली. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Embed widget