एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने पत्नीचा मृतदेह खांद्यावर, मुलीसह 10 किमी पायपीट
भुवनेश्वर : पत्नीचा मृतदेह खांद्यावर आणि सोबत 12 वर्षांची चिमुकली घेऊन, तब्बल 10 किमीपर्यंतची पायपीट करण्याची वेळ ओदिशातील एका व्यक्तीवर ओढवली. मृतदेहासाठी अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने हे धक्कादायक दृश्य कालाहंडी जिल्ह्यात पाहायला मिळालं.
दाना माझी या आदिवासी व्यक्तीच्या पत्नीचा टीबीमुळे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र हा मृतदेह घरी नेण्यासाठी त्याला अॅम्ब्युलन्स मिळाली नाही. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तो घरी नेणं गरजेचं होतं. मात्र वाट पाहूनही अॅम्ब्युलन्सच न मिळाल्याने, या व्यक्तीवर पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 10 किमीपर्यंतची पायपीट करण्याची वेळ आली.
माझीने विनंती करुनही त्याला अॅम्ब्युलन्स मिळाली नाही. त्यामुळे हतबल झालेल्या या आदिवासी तरुणाने तिला खांद्यावर टाकून गावात नेलं. यावेळी त्याची 12 वर्षांची मुलगीही त्याच्यासोबत होती.
ओडिशामध्ये नवीन पटनाईक सरकारने 'महापरायण' योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयात मृत्यू झाल्यास, मृतदेह मोफत घरापर्यंत पोहोचवला जातो.
माझी हा भवानीपटनापासून 60 किमीवर असलेल्या रामपूर ब्लॉकमधील मेलघारा गावचा रहिवासी आहे. काही पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन या घटनेची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देत 10 हजार रुपये रेडक्रॉस फंडातून मदत म्हणून दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement