एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE UPDATE : उत्तर गुजरातमध्ये भाजपचं निर्विवाद वर्चस्व
उत्तर गुजरात निवडणूक 2017 निकाल LIVE UPDATE
गांधीनगर : उत्तर गुजरात निवडणूक 2017 निकाल आज जाहीर होणार आहे. 182 जागांच्या विधानसभेत भाजपने 100 हून अधिक जागांवर आघाडी मिळवत, सलग चौथ्यांदा सत्ता स्थापनेच्या दिशेने आगेकूच केली आहे. तर काँग्रेसनेही निवडणुकी कडवी झुंज दिली आहे.
परंतु उत्तर गुजरातमध्ये भाजपचा मोठी आघाडी घेतली आहे. उत्तर गुजरातमधील 53 जागांपैकी तब्बल 33 जागांवर भाजपला आघाडी मिळाली आहे. तर काँग्रेसला 19 जागांवरच आघाडी मिळवता आली. याशिवाय इतरांच्या खात्यात एक जागा जमा झाली आहे.
दरम्यान, आज सकाळी आठ वाजता गुजरात निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण 182 जागांसाठी गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबरला मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान झालं होतं, तर दुसऱ्या टप्प्यात 68.70 टक्के मतदान झालं होतं.
काय सांगतो एक्झिट पोल?
उत्तर गुजरातचा कौल कुणाला? (एकूण जागा 53)
उत्तर गुजरातमध्ये कोणाला किती टक्के मतं?
एबीपी न्यूज-सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये सौराष्ट्र-कच्छ आणि दक्षिण गुजरातप्रमाणेच उत्तर गुजरातमध्येही भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. उत्तर गुजरातच्या एकूण 53 जागांपैकी भाजपला 49%, काँग्रेसला 42% आणि इतरांना 9% मतं मिळण्याची चिन्हं आहेत.
उत्तर गुजरातमध्ये कोणला किती जागा?
मतांची टक्केवारीचं रुपांतर जागांमध्ये केल्यास उत्तर गुजरातमध्ये भाजपच्या वाट्याला 32-38 जागा, काँग्रेसच्या वाट्याला 16-22 जागा येण्याचा अंदाज आहे. उत्तर गुजरातमध्ये इतरांना खातंही उघडता येणार नाही, असं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. जागांच्या सरासरीनुसार भाजप 35 जागा, काँग्रेसला 18 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
निकाल कुठे-कुठे पाहता येईल?
निकालाची प्रत्येक अपडेट तुम्हाला एबीपी माझाच्या वेबसाईटवरही मिळू शकेल. टीव्हीसोबतच तुमच्या स्मार्टफोनवर बातमी, फोटो आणि व्हिडिओ स्वरुपात तुम्हाला हा निकाल पाहता येईल. शिवाय देशातील सर्वात मोठं ऑनलाईन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म हॉटस्टारवरही एबीपी माझा पाहता येईल.
गुगल प्ले स्टोअरवरुन एबीपी लाईव्ह हे अॅप डाऊनलोड केल्यास तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, बंगाली आणि पंजाबी या सहा भाषांमध्ये निकाल पाहता येईल. शिवाय #ABPResults या हॅशटॅगसह तुम्ही ट्वीटही करु शकता.
लाईव्ही टीव्ही - http://abpmajha.abplive.in/live-tv
मराठी वेबसाईट - http://abpmajha.abplive.in
सोशल मीडियावर निकाल कसा पाहाल?
फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर तुम्हाला हा निकाल लाईव्ह पाहता येईल. फेसबुकवर एबीपी माझाची लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही दिवसभर पाहू शकता. शिवाय ट्विटरवरही क्षणाक्षणाची अपडेट मिळेल.
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - @abpmajhatv
यूट्यूब - https://www.youtube.com/abpmajhalive
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement