School Video Viral : धक्कादायक! डब्यात नॉनव्हेज आणलं म्हणून विद्यार्थ्याला थेट शाळेतून काढलं; नेमकं काय घडलं?
School Video Viral : शाळेत विद्यार्थ्याने डब्यात मांसाहारी पदार्थ आणल्याचे पाहून शाळेचे मुख्याध्यापकांनी संताप व्यक्त केला, त्याचबरोबर त्याला शाळेतून देखील काढलं आहे.
School Video Viral : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात एका नर्सरीच्या विद्यार्थ्याने मांसाहारी पदार्थ शाळेत आणल्याबद्दल एका मुलाला शाळेतून काढून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासंबधीचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या शाळेत विद्यार्थ्याने डब्यात मांसाहारी पदार्थ आणल्याचे पाहून शाळेचे मुख्याध्यापकांनी संताप व्यक्त केला, त्याचबरोबर त्याला शाळेतून देखील काढलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.(School Video Viral)
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका खासगी शाळेच्या विद्यार्थ्याने जेवणाच्या डब्यामध्ये नॉनव्हेज आणल्याचा आरोप शाळेच्या मुख्याध्यापकाने केला आहे. त्यानंतर मुख्याध्यापकाने त्या विद्यार्थ्याला शाळेतून देखील काढून टाकलं. यानंतर मुलाची आई आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्यामध्येल या गोष्टीवरून वाद झाल्याचे समोर आले आहे. या वादाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल (School Video Viral) होतो आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक मुलाच्या आईशी वाद घालताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये शाळेचे मुख्याध्यापक मुलाच्या आईला म्हणताना दिसतात, 'आम्ही मंदिर तोडणाऱ्या मुलाला शिक्षण देऊ शकत नाही. या मुलामुळे इतर मुलांना देखील त्रास होत असल्याचं शाळेच्या मुख्याध्यापकांनी म्हटलं आहे. अशा मुलांना आपण शिक्षण देऊ नये जे आपली मंदिरे नष्ट करतील. जेवणासाठी मांसाहार आणतील असंही ते पुढे म्हणतात. मुख्याध्यापकांनी दावा केला की, तुमचा मुलगा प्रत्येकाला नॉनव्हेज देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्याविषयी बोलतो,पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी शाळेत मुलासोबत भेदभाव केल्याचा आरोप केला असून मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. हा वाद सुरू आहे, तो विद्यार्थी नर्सरी वर्गाचा विद्यार्थी आहे.
दरम्यान व्हिडीओमध्ये या विद्यार्थ्याने शाळेत नॉनव्हेज आणलं नसल्याचं स्पष्टीकरण मुलाची आई देताना दिसत आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी आरोप केल्यानंतर त्यावर उत्तर देताना मुलाच्या आईने सांगितले की, 7 वर्षांचा मुलगा अशा गोष्टींबद्दल बोलू शकत नाही. त्यावर शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले की, मुलांना हे सर्व त्यांच्या पालकांनी शिकवलं आहे. शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारी देखील येत असल्यामुळे या विद्यार्थ्याचे नाव शाळेच्या रजिस्टरमधून काढून टाकण्यात आल्याचे मुख्याध्यापकांनी म्हटलं आहे.
या विद्यार्थ्यांच्या आईने शाळेतील इतर मुलावर तिच्या मुलाला मारहाण करण्याचा आणि वारंवार त्रास दिल्याचा आरोप केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. यावर शाळेच्या मुख्याध्यापकांनी उत्तर देताना म्हटलं की, तुम्ही आता दुसऱ्या विद्यार्थ्यावर आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहात. पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून अमरोहा पोलिसांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या घटनेनंतर सोशल मिडीयावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.