एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
15 किलो सोनं, 80 किलो चांदीसह 140 कोटीची काळीमाया दिल्लीत जप्त
नवी दिल्ली: डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलीजेन्सने नोएडामधील लाल महल लिमिटेड कंपनीवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात काळी माया जप्त केली आहे. डीआरआयने या कारवाईत 140 कोटीचे काळे धन पांढरे करण्याच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश केल्याचे बोलले जात आहे.
या कारवाईत 15 किलोचे सोन्याचे दागिने, 80 किलो चांदी आणि 2.5 कोटीची रोकड जप्त केली आहे. या छापेमारीची चुणूक लागताच कंपनीचा संचालक रुग्णालयात दाखल झाला असून, डीआरआय लवकरच त्याला अटक करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वास्तविक, लाल महल कंपनीला सोन्यापासून दागिने बनवून परदेशात पाठवायचे होते. पण नोटाबंदीमुळे कंपनीने तब्बल 430 किलोचे सोन्याची काळीमाया दलालांना विकून पांढरे केले. याची माहिती डीआरआयला मिळताच अधिकाऱ्यांनी छापा टाकून कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त केला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीनंतर लाल महल या कंपनीने आपल्या एका संबंधित कंपनीला मोठ्या प्रमाणावर पैसे आरटीजीएसच्या माध्यमातून पाठवले. याच पैशांतून सरकारी कंपनी एमएमटीसीकडून सोने खरेदी करण्यात येणार होते. मात्र, जे सोने परदेशात पाठवायचे होते. तेच सोने काळा पैशांचा दलालांना विकण्यात आले. सध्या या प्रकरणी डीआरआयकडून सखोल चौकशी करण्यात येत असून, तपास यंत्रणांनी याप्रकरणी अनेकांची चौकशी केली आहे. याप्रकरणी अनेकांना लवकरच अटक करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यापूर्वी 19 डिसेंबर रोजी नोएडामधीलच महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावर डीआरआयने छापा टाकून मोठ्या घोटाळा उघडकीस आणला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
राजकारण
नाशिक
Advertisement