नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जींचं भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले...
भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती डळमळीत झाली आहे, असं मत नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जीं यांनी व्यक्त केलं आहे. अभिजीत बॅनर्जी यांना गरिबी निर्मूलनाच्या संशोधनासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचं अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. अभिजीत बॅनर्जी यांनी सध्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत झाल्यांचं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ असल्याने त्यांचं वक्तव्य गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हीच परिस्थिती कायम राहिल्यास भारताची अर्थव्यवस्था लवकर सुधारेल याची शक्यता कमी आहे, असं मत बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.
भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती डळमळीत झाली आहे. सध्याच्या विकासदराच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती ही चिंतेची बाब आहे. गेल्या 5-6 वर्षात अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात प्रगती झाली, मात्र आता ती आशाही कमी झाली आहे, असं अभिजीत बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतील एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
अभिजीत बॅनर्जी यांना गरीबी निर्मूलनाच्या संशोधनासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अभिजीत बॅनर्जी यांच्यासोबत एस्थर डुफलो आणि मायकल क्रेमर यांनाही नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. एवढ्या लवकर नोबेल पुरस्कारने गौरव होईल, असं वाटलं नव्हतं. गेल्या 20 वर्षांपासून मी संशोधन करत आहे. गरीबी निर्मूलनासाठी योग्य उपाय शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी प्रतिक्रिया अभिजीत बॅनर्जी यांनी दिली आहे.
- भारतीय वंशाच्या अभिजीत बॅनर्जी यांच्यासह तिघांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक
- Nobel Prize | कोण आहेत आजवरचे नोबेल पुरस्कार विजेते भारतीय?
कोण आहेत अभिजीत बॅनर्जी?
अभिजीत बॅनर्जी यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1961 मध्ये कोलकातामध्ये झाला. अभिजीत यांची आई कोलकाताच्या सेंटर फॉर स्टडिज इन सोशल सायन्समध्ये अर्थशास्त्राच्या प्रोफेसर होत्या. तर वडील दीपक बॅनर्जी हे देखील प्रेसिडन्सी कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते.
अभिजीत बॅनर्जी यांनी 1981 मध्ये प्रेसिडन्सी काँलेजमध्ये अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात 1983 मध्ये अर्थशास्त्रात एमएचं शिक्षण पूर्ण केलं. 1988 मध्ये हार्वर्ड विद्यापीठात पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं.
VIDEO | भारताची अर्थव्यवस्था एका व्यक्तीच्या मर्जीप्रमाणे चालू शकत नाही : रघुराम राजन | ABP Majha
VIDEO | रोजगाराची स्थिती बिघडणार, अर्थव्यवस्था बिघडली, RBI चा सर्वे | ABP MAJHA