एक्स्प्लोर
IRCTC वर 2 मे रोजी सहा तास तिकीट बुकिंग बंद
आयव्हीआरएस टच स्क्रीन, कॉल सेंटर आणि रेल्वे फोन नंबर 139 या माध्यमातून तुम्हाला रेल्वेशी संबंधित माहिती मिळू शकेल. त्यामुळे प्रवाशांना तशी फार अडचण येणार नाही.
मुंबई : आयआरसीटीसी ही रेल्वेची ऑनलाईन तिकीट बुकिंग साईट आज सहा तास बंद राहणार आहे. 2 मे रोजी रात्री 10.45 वाजल्यापासून 3 मे रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत वेबसाईट बंद राहील. त्यामुळे या काळात ऑनलाईन तिकीट बुक करता येणार नाही.
रेल्वेच्या पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टमला (पीआरएस) अपडेट केले जाणार असल्याने वेबसाईट सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग अधिक अद्ययावत करण्यासाठी ऑनलाईन सिस्टममध्ये काही नवीन फीचर्स समाविष्ट केले जातील.
कोणत्या नवीन गोष्टींसाठी अपडेट :
1. रेल्वे तिकीट बुकिंग अधिक सुरक्षित.
2. वेबसाईटची देखभाल करणं शक्य होईल.
3. वेबसाईट अपग्रेड केली जाईल.
दरम्यान, ज्या सहा तासात वेबसाईट बंद असेल, त्या कालावधीत तिकीट बुक करता येणार नाही किंवा रद्दही केलं जाऊ शकत नाही. रेल्वेच्या ऑनलाईन चौकशीशी संबंधित सेवाही या कालावधीत बंद असतील.
आयव्हीआरएस टच स्क्रीन, कॉल सेंटर आणि रेल्वे फोन नंबर 139 या माध्यमातून तुम्हाला रेल्वेशी संबंधित माहिती मिळू शकेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement