एक्स्प्लोर
मालमत्ता आधारशी लिंक करण्याचा विचार नाही : केंद्र
मालमत्ताही आता आधारशी लिंक कराव्या लागणार, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यावर केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यात आला.
![मालमत्ता आधारशी लिंक करण्याचा विचार नाही : केंद्र No proposal to make Aadhaar linkage mandatory for property deals: Govt tells in Parliament मालमत्ता आधारशी लिंक करण्याचा विचार नाही : केंद्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/12121701/building-construction-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रातिनिधिक फोटो
नवी दिल्ली : मालमत्ता आधार कार्डशी लिंक करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही, अशी माहिती संसदेत गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली. मालमत्ताही आता आधारशी लिंक कराव्या लागणार, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यावर केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यात आला.
दरम्यान, असा प्रस्ताव विचाराधीन नसला तरी मालमत्ता नोंदणी अधिनियम 1908 च्या कायद्यानुसार, मालमत्तांच्या नोंदणीसाठी आधारचा वापर करावा, असे आदेश ग्रामविकास मंत्रालयाने राज्यांना दिले असल्याचंही हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं.
मालमत्तांच्या खरेदी व्यवहारांसाठी आधार अनिवार्य करणं ही चांगली कल्पना आहे. बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याचा तर नियम करण्यात आलाच आहे. मालमत्तांशी आधार लिंक करण्याचीही वेळ येऊ शकते, असं हरदीप सिंह पुरी यांनी नोव्हेंबरमध्ये म्हटलं होतं.
संबंधित बातमी : आता मालमत्ताही आधारशी लिंक करावी लागणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)