एक्स्प्लोर

आरबीआयकडून रेपो दरात कोणताही बदल नाही!

आरबीआयने जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. शिवाय महागाई वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने रेपो दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे व्याजदर कपातीकडे डोळे लावून बसलेल्या कर्जदारांची निराशा झाली आहे.  यापूर्वी जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात आरबीआयने पाव टक्क्यांनी कपात केली होती. ऑगस्टमध्ये जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो दर 6.50  टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांवर आला होता. तर रिव्हर्स रेपो दर 6 टक्क्यांवरुन 5.75 टक्क्यांवर आला होता. यावेळीही हाच दर कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान घसरलेल्या विकास दरावरुन सरकार अगोदरच चिंतेत असताना आता आरबीआयनेही त्याला दुजोरा दिला आहे. आरबीआयच्या ताज्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात विकास दर 7.3 टक्क्यांऐवजी 6.7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. महागाई वाढणार! जीएसटी लागू झाल्यानंतर महागाई कमी होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र आरबीआयने हा अंदाज फेटाळला आहे. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातली वाढ, खरीप उत्पादन घटण्याची शक्यता आणि शेतकरी कर्जमाफीमुळे महागाई वाढण्याचा अंदाज आरबीआयने वर्तवला आहे. ग्राहकांकडून कमी झालेली मागणी, गुंतवणुकीतील मंदावलेला वेग आणि निर्यात कमी झाल्याने एकूण मागणी घटली आहे. जीएसटीमुळे पुन्हा एकदा निर्मिती क्षेत्रावर परिणाम झाला. शेती क्षेत्राची परिस्थिती स्थिर आहे. तर सेवा क्षेत्रामध्ये किंचित सुधारणा झाली आहे. ऑगस्टमध्ये महागाई दर 3.2 टक्के होता. त्यामुळे या आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीत महागाई दर चार ते साडे चार टक्क्यांपर्यंत असेल, असा अंदाज लावण्यात आला होता. मात्र हा दर आता 4.2 ते 4.6 टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. महागाई दर 2 ते 6 टक्क्यांच्या आत ठेवण्याचं उद्दीष्ट आहे. रेपो दराचा तुमच्यावर काय परिणाम? बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते, त्यावर रिझर्व्ह बँक जो व्याजदर आकारते, त्याला रेपो रेट म्हणतात. जर रेपो रेट कमी झाला, तर बँकांना रिझर्व्ह बँकेला कमी व्याज द्यावं लागेल. त्यामुळे जर बँकांना फायदा झाला, तर बँका ग्राहकांनाही व्याजदर कपात करुन फायदा मिळवून देते. रिव्हर्स रेपो रिव्हर्स रेपो म्हणजे बँका आपला पैसा रिझर्व्ह बँकेत ठेवतात, त्यावर आरबीआय जो व्याजदर देते त्याला रिव्हर्स रेपो दर म्हणतात. जर आरबीआयने दर कपात केली, तर बँकाही व्याजदरात कपात करतात. त्याचा परिणाम बँकेत पैसे सेव्हिंग करणाऱ्यांवर होतो. रेपो रेट म्हणजे काय? रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर.  रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

महत्त्वाच्या बातम्या

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
CJP Protest in Kochi: कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
विश्वास बसणार नाही पण सत्य आहे, फक्त झोपून महिलेने कमावले 10 लाख रुपये, मुंबईची जिनिया ठरली 'स्लीप चॅम्पियन' 
विश्वास बसणार नाही पण सत्य आहे, फक्त झोपून महिलेने कमावले 10 लाख रुपये, मुंबईची जिनिया ठरली 'स्लीप चॅम्पियन' 

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
CJP Protest in Kochi: कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
Mumbai Local Train Fight : चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; एकजण धावत्या ट्रेनमधून फेकला गेला, ज्याने पाहिलं ते सगळे हादरले
चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; एकजण धावत्या ट्रेनमधून फेकला गेला, ज्याने पाहिलं ते सगळे हादरले
Devendra Fadnavis: 'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
Gokul Election: मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
Embed widget