एक्स्प्लोर

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या किंमत

Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासंपासून देशातील इंधन दरवाढ स्थिर आहे. सलग दहाव्या दिवशीनंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. राज्यस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल-डिझेल देशातील सर्वात महाग मिळतेय. तर पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त. श्रीगंगानगरच्या तुलनेत पोर्ट ब्लेयरमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) जवळपास 33 रुपये स्वस्त आहे. ताज्या आकडेवारीनुसार, शनिवारी पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 82.96 रुपये इतकी आहे. तर डिझेलची किंमत 77.13 रुपये प्रति लीटर इतकी आहे.

भारतीय तेल कंपन्यांनी 3 नोव्हेंबरपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंडियन ऑइल कंपन्यानी शनिवारी जारी केलेल्या किंमतीनुसार,  आज मुंबईत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत  94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत (Petrol Price)103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत  86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे.

कितीनं महागलं होतं पेट्रोल – डिझेल :
सप्टेंबरच्या अखेरपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढायला सुरुवात झाली. मागील 10 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र, नोव्हेंबर महिन्यात पेट्रोल प्रति लीटर 8.15 रुपयांनी महागलं होतं. तर डिझेल 9.45 रुपयांनी महागलं.  

देशातील महत्त्वाची शहरं  पेट्रोल रुपये/लिटर  डिझेल रुपये/लिटर
मुंबई  109.98  94.14
दिल्ली  109.69     98.24
चेन्नई  104.67    89.79
कोलकाता  101.40  91.43

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

या राज्यांनी व्हॅट केला कमी -
केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात कपात करण्यात आल्यानंतर आसाम, त्रिपुरा, गोवा, उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि कर्नाटक सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट केली होती. त्यासोबत हरियाणामध्येही व्हॅट कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. या सर्व राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. दरम्यान, पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता असलेल्या अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट अद्याप कमी करण्यात आलेला नाही.   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manjili Karad Beed PC : SIT, धस, बजरंग सोनवणेंवर आरोप;कराडच्या पत्नीनं सगळच सांगितलंWalmik Karad Wife Reaction : दोषी असतील तर कारवाई होईल, वाल्मिक कराडची पत्नी म्हणाली...Zero Hour Full | वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, इतक्यात तरी जामीन मिळणं अतिशय कठीणABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
Embed widget