एक्स्प्लोर

Nitin Gadkari: गडकरी म्हणाले, देशात गरिबांची संख्या वाढत आहे, काही श्रीमंत लोकांच्या हातामध्येच संपत्ती एकवटली; आता गडकरींचा दाखला देत मोदींचा खोटारडेपणा म्हणत काँग्रेसनेही तोफ डागली!

Nitin Gadkari: नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात देशातील वाढती गरिबी आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात ती एकाग्र झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यावरून आता काँग्रेसने मोदींवर तोफ डागली.

Nitin Gadkari:  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात देशातील वाढती गरिबी आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात ती एकाग्र झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ग्रामीण भागाच्या कल्याणासोबतच आर्थिक विकास करता यावा यासाठी संपत्तीचे विकेंद्रीकरण आवश्यक असल्याचे ते म्हणाले. नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी शेती, उत्पादन, कर आकारणी आणि पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. गडकरी म्हणाले, 'हळूहळू गरीब लोकांची संख्या वाढत आहे आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्ती एकवटत आहे. असे होऊ नये. अर्थव्यवस्था अशा प्रकारे वाढली पाहिजे की ज्यामुळे रोजगार निर्माण होतील आणि ग्रामीण भागाला चालना मिळेल.'

मोदी सरकारमधील मंत्री सरकारची पोलखोल करत आहे 

दरम्यान, नितीन गडकरींच्या वक्तव्याचा दाखला देत काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. मोदींच्या खोटारडेपणाचा नितीन गडकरी यांनी फॅक्ट चेक केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मोदी एका रॅलीत बोलताना देशात आपल्या सरकारच्या प्रयत्नामुळे गरीबी कमी होत असल्याचा दावा करत आहेत. याच वक्तव्याला गडकरी यांनी केलेल्या विधानाला जोडत काँग्रेसने मोदी सरकारमधील मंत्री सरकारची पोलखोल करत असल्याचे म्हटले आहे. दोन्ही नेत्यांच्या भाषणाची क्लिप ट्विटमध्ये पोस्ट केली आहे. 

दरम्यान, गडकरी म्हणाले की, अर्थव्यवस्था अशा प्रकारे वाढली पाहिजे की ज्यामुळे रोजगार निर्माण होतील आणि ग्रामीण भागाला चालना मिळेल. ते म्हणाले, 'आम्ही अशा आर्थिक मॉडेलचा विचार करत आहोत जे रोजगार निर्माण करेल आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना देईल. संपत्तीचे विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे आणि या दिशेने अनेक बदल करण्यात आले आहेत.' गडकरी यांनी माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या उदारमतवादी आर्थिक धोरणांचे कौतुक केले, परंतु अनियंत्रित केंद्रीकरणाविरुद्ध इशारा दिला. ते म्हणाले, 'आपल्याला याची काळजी घ्यावी लागेल.'

त्याला तत्वज्ञान शिकवता येत नाही

भारताच्या आर्थिक रचनेचा संदर्भ देत गडकरी यांनी जीडीपीमध्ये विविध क्षेत्रांच्या योगदानातील असमतोल अधोरेखित केला. ते म्हणाले, 'उत्पादन क्षेत्राचे योगदान 22-24 टक्के आहे, सेवा क्षेत्र 52-54टक्के आहे, तर ग्रामीण लोकसंख्येच्या 65-70 टक्के लोकसंख्येवर अवलंबून असलेल्या कृषी क्षेत्राचे योगदान फक्त 12 टक्के आहे.' स्वामी विवेकानंदांचा उल्लेख करून ते म्हणाले की ज्या व्यक्तीचे पोट रिकामे आहे त्याला तत्वज्ञान शिकवता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget