एक्स्प्लोर
गणपतीत कोकणवासियांसाठी मुंबई-पुणे महामार्ग टोल माफ करा: नितेश राणे
मुंबई: मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे यंदा कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी मुंबई-पुणे महामार्गाने कोकणात जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या सगळ्या गाड्यांचा टोल माफ करावा, अशी मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विटरवर ट्वीट केलं आहे.
सरकारने टोल माफ करण्याची मागणी मान्य करावी, अन्यथा कोकणी माणसाच्या हक्कासाठी काहीही करु, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात टोलच्या मुद्द्यावरुन पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
मुबंई गोवा महामार्ग ची हालत बघता, बहुतेक चाकरमाणी या वर्षी मुंबई पुणे एक्सप्रेस मार्ग गणपती साठी वापरणार आहेत..हे बघता शासनाने कोकणाला..
— nitesh rane (@NiteshNRane) August 17, 2016
दरम्यान, मुंबई एंट्री पॉईंटवरील टोल बंद करण्याची मागणी गेले अनेक दिवस सुरु आहे. त्यामुळे आता राज्य सरकार नितेश राणेंच्या या मागणीवर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.जाणारया सगळ्याच गाड्यांना 'टोल फ्री' कराव असी मागणी मी शासनाकडे करणार आहे..मान्य केली तर ठीक..नाही तर कोकणी माणसाच्या हकका साठी काही करु
— nitesh rane (@NiteshNRane) August 17, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement