आनंदीबेन पटेल उत्तर प्रदेशच्या नव्या राज्यपाल, सहा राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती
बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांना मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदी नियुक्त करण्यात आलं आहे. तर फागू चौहान आता बिहारचे राज्यपाल असतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालसह एकूण सहा राज्यामध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे विद्यमान राज्यपाल राम नाईक यांच्या जागी आनंदीबेन पटेल यांची वर्णी लागली आहे.
बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांना मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदी नियुक्त करण्यात आलं आहे. तर फागू चौहान आता बिहारचे राज्यपाल असतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.
सहा राज्यांमध्ये नवीन राज्यपाल
आनंदीबेन पटेल आनंदीबेन पटेल मध्य प्रदेशच्या विद्यमान राज्यपाल आहेत. त्यांना आता उत्तर प्रदेशच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
जगदीप धनकर जगदीप धनकर यांना पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी केशरीनाथ त्रिपाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल होते.
रमेश बेस कप्तान सिंह सौलंकी यांच्या जागी आता रमेश बेस यांची त्रिपुराच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लालाजी टंडन बिहारचे विद्यमान राज्यपाल लालाजी टंडन यांना मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
फागु चौहान लालाजी टंडन यांच्या जागी फागु चौहान बिहारचे नवे राज्यपाल असतील.
आर.एन रवी आर.एन रवी नागालँडचे नवे राज्यपाल असतील. याआधी पद्मनाथ बालकृष्ण आचार्य नागालँडचे राज्यपाल होते.