एक्स्प्लोर

New Delhi Railway Station Stampede: यात्रीगण कृपया ध्यान दें...दिल्ली रेल्वे स्थानकावर एक घोषणा अन् होत्याचं नव्हतं झालं, 18 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची घटना शनिवारी (15 फेब्रुवारी) रात्री 8.30-9 वाजताच्या सुमारास घडली.

New Delhi Railway Station Stampede नवी दिल्ली: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर (New Delhi Railway Station Stampede) झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर शनिवारी (15 फेब्रुवारी) रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घटली. प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आले. यामुळे हा गोंधळ उडाला. 

दिल्ली स्टेशनवरुन प्रयागराजला (Prayagraj trains) जाणारी गाडी (Kumbh Mela special trains) पकडण्यासाठी गर्दी उसळली होती. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली. यानंतर स्टेशनवरील प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाले. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 20 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. सदर घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर गंभीर जखमींना अडीच लाख आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे. दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. तर अचानक झालेली गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. (New Delhi Railway Station Stampede Marathi News)

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर नेमकं काय घडलं? (What exactly happened at the New Delhi railway station?)

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची घटना शनिवारी (15 फेब्रुवारी) रात्री 8.30-9 वाजताच्या सुमारास घडली. प्रयागराजला जाण्यासाठी स्टेशनवर हजारोंचा जमाव उपस्थित होता. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, पोलिस उपायुक्त (रेल्वे) यांनी सांगितले की, जेव्हा प्रयागराज एक्सप्रेस ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर उभी होती, तेव्हा तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस उशिराने धावत होत्या आणि या गाड्यांमधील प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक 12, 13 आणि 14 वर देखील उपस्थित होते. ते म्हणाले, रेल्वे दर तासाला 1500 जनरल तिकिटे विकत होती, त्यामुळे स्टेशनवर गर्दी वाढली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली. यानंतर स्टेशनवरील प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाले. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 16 दरम्यान एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली.

संबंधित बातमी:

New Delhi Railway Station Stampede: धावाधाव, आरडाओरड अन् किंकाळ्या...; नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत 18 जणांनी गमावला जीव, हादरवणारे PHOTO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Saamana Article: '....तेव्हा 56 इंचवाल्यांची धांदल उडाली', भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा द्रोह मोदी करतायत, 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर आगपाखड
'....तेव्हा 56 इंचवाल्यांची धांदल उडाली', भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा द्रोह मोदी करतायत, 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर आगपाखड
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Hema Malini On CJP Protest: 'आंदोलनाचा काहीच फायदा नाही, मोदी सरकारनं खूप काम केलंय...'; हेमा मालिनींनी CJP च्या आंदोलनाला म्हटलं निरर्थक, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर मात्र...
'आंदोलनाचा काहीच फायदा नाही, मोदी सरकारनं खूप काम केलंय...'; हेमा मालिनींच्या मते CJP प्रोटेस्ट निरर्थक, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर मात्र...
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Jantar Mantar Lathi Charge: आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Embed widget