नवी दिल्ली :  नीट (NEET) मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णयासह सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मागासवर्गीयांना आरक्षण देण्याच्या संदर्भातील काही गैरसमजही दूर केले आहेत. जगभर आरक्षण देण्याच्या तत्त्वांचे तपशीलवार वर्णन करताना न्यायालयाने म्हटले की, उच्च गुण मिळवणे हे गुणवत्तेचे वैशिष्ट्य नाही. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, आरक्षणविरोधी युक्तिवाद करतात की आरक्षण धोरण गुणवत्तेवर आधारित समाजाच्या विरोधात आहे. ते उच्च गुणांना गुणवत्तेची ओळख समजतात.


परीक्षा हा शैक्षणिक संधी वितरीत करण्याचा सोयीस्कर मार्ग 


वास्तविकता शैक्षणिक संधी वितरीत करण्यासाठी परीक्षा हा एक आवश्यक आणि सोयीस्कर मार्ग आहे. परीक्षेत मिळालेले गुण हे एखाद्या व्यक्तीची गुणवत्ता ठरवण्यासाठी नेहमीच योग्य माप नसतात. कारण एखाद्या व्यक्तीची प्रतिभा त्याच्या परीक्षेत दाखवलेल्या कामगिरीच्या पुढे जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) म्हटले की, एक परीक्षा (Exam) एखाद्या व्यक्तीची प्रतिभा किंवा गुणवत्ता ठरवू शकत नाही. 


अनेक विश्वविद्यापीठांनी मूल्यांकनाचे प्रमाण बदलले
आता विद्यापीठांनी (University) (दिल्ली विद्यापीठासह) वस्तुनिष्ठ चाचणी, गट चर्चा, यांसारख्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्याऐवजी अनेक चाचण्या घेणे बंधनकारक केले आहे. व्यक्तिमत्व चाचणी, मुलाखत (Interview), तोंडी चाचणी (Viva), लेखी चाचणी (Written Test) आणि वैयक्तिक सादरीकरण (Individual Presentation) इत्यादी विषयांवर मुल्यांकन ठरवले जाते. एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत चांगली कामगिरी करता आली नाही तर तो दुसऱ्या परीक्षेत चांगली कामगिरी करू शकतो, हे यामागचं कारण आहे.



इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha