Canada News : कोरोनाचा वाढता धोका पाहता कॅनडामध्ये कोरोना लस घेणे बंधनकारक करण्यात आली आहे. यामुळे राजधानी ओटावामध्ये हजारो नागरिकांनी कोविड लस अनिवार्य करण्याविरोधात आणि महामारीमुळे लादलेल्या कडक निर्बंधांना विरोध केला. काही आंदोलकांनी कोविड निर्बंधांची तुलना समाजसत्तावाद विरोधी तत्वांशी केली आहे. इतकंच नाही तर पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात येत आहे. दरम्यान, काही मीडिया रिपोर्टनुसार दावा करण्यात आहे की, प्रचंड विरोधानंतर जस्टिन ट्रूडो यांनी आपल्या कुटुंबासह राजधानी सोडली आणि गुप्त ठिकाणी स्थलांतरित झाले.
आंदोलनाता ट्रक चालकांचा मोठ्या संख्येने समावेश
कॅनडाच्या सरकारने कोविड-19 संसर्ग रोखण्यासाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. सीमा ओलांडण्यासाठी लसीकरण बंधनकारक केले आहे. त्यामुळे नागरिकांना विशेषत: ट्रक चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, कॅनडाच्या सरकारने यूएसमधून येणाऱ्या सर्व ट्रक चालकांना पूर्णपणे लसीकरण करणे अनिवार्य केले. याशिवाय लसीकरण न झालेल्यांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहण्याचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळेच आंदोलकांमध्ये ट्रक चालकांची संख्या लक्षणीय आहे.
निर्बंध मागे घेते राजीमनाम्याची मागणी
वाढत्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलीस प्रशासन हाय अलर्टवर आहे. निदर्शकांनी कॅनडाच्या ध्वजांसह नाझी चिन्हे आणि झेंडेही फडकवले. ट्रूडो यांना लक्ष्य करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. मॉन्ट्रियल येथील डेव्हिड सँटोस म्हणाले की, लसीकरण अनिवार्य करणे हे आरोग्याशी संबंधित नाही, तर गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारची एक युक्ती आहे असे त्यांना वाटते. आंदोलकांनी सर्व कोविड निर्बंध आणि लसीकरण अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी करत आणि पंतप्रधान ट्रुडो यांचा राजीनामा मागितला आहे.
इतर बातम्या :
- बायडेन यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, फोटो शेअर करत दिली माहिती
- कोरोना लसीमुळे 21 आजारांपासून संरक्षण, जागतिक आरोग्य संघटनेची माहिती
- WFH in Corona : वर्क फ्रॉम होमचं हवं! 82 टक्के लोकांना ऑफिसला परतायची इच्छा नाही, अभ्यासात उघड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha