Budget Session 2022 PM Narendra Modi LIVE : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. अशातच विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी अधिवेशनात सर्वांनी चर्चा करावी आणि देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी उत्तम चर्चा व्हावी असं आवाहन केलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. मी या अधिवेशनात सर्वांचं स्वागत करतो. आज वैश्विक स्तरावर भारतासाठी खूप संधी आहेत.  देशाची आर्थिक प्रगती, लसीकरण कार्यक्रम, मेड इन इंडिया वॅक्सिनबाबत जगात एक विश्वास तयार झाला आहे. या अधिवेशनातही यावर मुक्त चर्चा होईल जेणेकरुन जगभरात एक विश्वास तयार होईल अशी चर्चा व्हावी, असं मोदी म्हणाले.  






पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्व राजकीय पक्षातील सदस्य खुल्या मनानं उत्तम चर्चा करुन देशाला पुढं नेण्यासाठी नक्कीच मदत करतील. ही गोष्ट खरी आहे की वारंवार निवडणुकांमुळं अधिवेशनं प्रभावित होतात. मात्र मी सर्व सदस्यांना विनंती करतो की निवडणुका आपल्या जागी त्या चालत राहतील मात्र आपण अधिवेशनात फलदायी चर्चा करावी. 


पंतप्रधान म्हणाले की, मुक्त आणि मानवी संवेदनांसह चर्चा करुन आगामी वर्षात नव्या आर्थिक उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करुयात. 



महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha