श्रीमंतांच्या गाडीत 8 एअरबॅग सर्वसामान्यांच्या गाडीत फक्त 2-3 एअरबॅग का? नितीन गडकरींचा कार निर्मात्या कंपन्यांना सवाल
वाहनाच्या सर्व वेरिएंट आणि सेगमेंटमध्ये किमान 6 एअरबॅग दिल्या जाव्यात. जेणेकरुन सर्वसामान्य नागरिकरही सुरक्षित प्रवास करु शकतील, असं आवाहन नितीन गडकरी यांनी कार निर्मात्या कंपन्यांना केलं आहे.
![श्रीमंतांच्या गाडीत 8 एअरबॅग सर्वसामान्यांच्या गाडीत फक्त 2-3 एअरबॅग का? नितीन गडकरींचा कार निर्मात्या कंपन्यांना सवाल need more airbags in small cars to make them safer said Nitin gadkari श्रीमंतांच्या गाडीत 8 एअरबॅग सर्वसामान्यांच्या गाडीत फक्त 2-3 एअरबॅग का? नितीन गडकरींचा कार निर्मात्या कंपन्यांना सवाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/18/77f6b61d77dd7d77b65273efebc3d69c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nitin Gadkari : कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या केवळ श्रीमंतांच्या महागड्या कार्समध्ये आठ एअरबॅग्स (Airbags) उपलब्ध करुन देतात. मात्र जास्तीत जास्त सर्वसामान्य नागरिक लहान कार खरेदी करतात. या कार्समध्ये मात्र केवळ दोनच एअरबॅग्स असतात, यावरुन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नाराजी व्यक्त केली. लहान कारमध्ये देखील पुरेशा एअरबॅग असाव्यात अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी लहान आणि स्वस्त कारमध्ये अधिक एअरबॅग्ज पुरवण्याचे आम्ही आवाहन करत आहोत. नितीन गडकरी यांचं हे वक्तव्य अशा वेळी आलं आहे ज्यावेळी हायर टॅक्सेशन, सेफ्टी नियमांची अमलबजावणी याबाबत वाहन उद्योगाने चिंता व्यक्त केली आहे. यामुळे कारच्या किमतीत वाढ असल्याचे कार निर्मात्या कंपन्यांचं म्हणणं आहे.
किमान 6 एअरबॅग असाव्यात
नितीन गडकरी यांनी म्हटलं की, लोअर मीडल क्लास नागरिक लहान इकोनॉमिक कार विकत घेत असतात आणि त्यांच्या कारमध्ये सुरक्षेसाठी पुरेशा एअरबॅग नसल्यास आणि अपघात झाल्यास त्यांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून मी सर्व कार उत्पादकांना आवाहन करतो की वाहनाच्या सर्व वेरिएंट आणि सेगमेंटमध्ये किमान 6 एअरबॅग दिल्या जाव्यात. जेणेकरुन सर्वसामान्य नागरिकरही सुरक्षित प्रवास करु शकतील.
किंमत 3000 ते 4000 रुपयांपर्यंत वाढेल
एअरबॅग्सची संख्या वाढली तर कारमधील अतिरिक्त एअरबॅगमुळे कारची किंमत प्रति एअरबॅग 3,000 ते 4,000 रुपयांनी वाढेल. मात्र रस्ते अपघात झाल्यास आपल्या देशातील गरिबांनाही संरक्षण मिळाले पाहिजे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. श्रीमंतांसाठी तुम्ही 8 एअरबॅग देता. मग स्वस्त कारसाठी ज्या सर्वसामान्य नागरिक वापरतात त्यांना फक्त 2-3 एअरबॅग देता, असे का? असा सवालही नितीन गडकरी यांनी कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना विचारला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)