भारताला मोठं यश, आकाश प्राइम एअर डिफेन्सची चाचणी यशस्वी, पाकिस्तान, चीनसह तुर्कीचं टेन्शन वाढणार
आकाश प्राइम एअर डिफेन्स सिस्टीमची 15 हजार फूट ऊंचीवरुन लडाख सेक्टरमध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. यामुळं पाक, चीन आणि तुर्कीला धडकी भरु शकते.

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान चीन, पाकिस्तान आणि तुर्की या तीन देशांनी भारताविरुद्ध भूमिका घेतली होती. आता या तीन देशांना धडकी भरवणारी चाचणी भारतानं केली आहे. भारताच्या आकाश प्राइम एअर डिफेन्सची लडाखमध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी 15 हजार फूट ऊंचीवर घेण्यात आली. यामुळं दुश्मन देश भारताविरोधात पाऊल टाकताना पहिल्यांदा विचार करतील. भारताविरुद्ध पाऊल उचललं तर त्यांना नुकसान होऊ शकतं.
संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार परिक्षण सुरु असताना जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या मिसाईलनं अत्यंत ऊंच क्षेत्रात वेगानं जाणाऱ्या विमानांवर दोन वेळा थेट प्रहार केला. आकाश प्राइम सिस्टीम भारतीय सेनेत आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची तिसऱ्या आणि चौथ्या रेजिमेंटची स्थापना करेल. या स्सिटीमनं ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान चीनच्या विमानांना आणि तुर्कीच्या ड्रोनच्या हल्ल्यांना निष्प्रभ केलं होतं. आकाश प्राइम एअर डिफेन्सची चाचणी डीआरडीओ आणि इंडियन आर्मीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र येत केलं.
या यशस्वी चाचणीनंतर भारतीय सैन्याच्या हवाई संरक्षण नेटवर्कचा भाग म्हणून आकाश प्राइम डिफेन्स सिस्टीमला सामील करुन घेण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल आहे. अधिकाऱ्यांनी म्हटलं की आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची तिसरी आणि चौथी रेजिमेंट आकाश प्राईमचा वापर करण्यासाठी बनवली जाऊ शकते. आकाश प्राइम भारताच्या आत्मनिर्भर संरक्षण उत्पादनं, प्रामुखं हवाई संरक्षण यासारख्या क्षेत्रातील व्यापक प्रयत्नांचा भाग आहे.
संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार स्वदेशी निर्मित आणि विकसित आकाश एअर डिफेन्स सिस्टीम जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या मिसाईल एअर डिफेन्स सिस्टीमनं पश्चिमेकडून सीमा आणि जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांना नाकाम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हवाई हल्ल्यांना प्रतिबंध करण्यात आणि त्यापासून बचाव करण्यासाठी आकाश प्राइम एअर डिफेन्स सिस्टीमची स्थापना करण्यात आली आहे.
22 एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतानं मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ले केले होते. भारतानं दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले होते. त्यात 100 दहशतवादी मारले गेले होते. भारतानं सुरु केलेल्या कारवाईला पाकिस्तानकडून उत्तर देण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामध्ये चीनच्या विमानांचा आणि तुर्कीच्या ड्रोनचा वापर करण्यात आला होता. मात्र, भारतानं पाकिस्तानचे हल्ले नाकाम केले होते.
In a significant development, Indian Army today carried out successful trials of the indigenously developed Akash Prime air defence system at over 15,000 feet altitude in the Ladakh sector. The trial were carried out by the Army Air Defence along with senior officials of the… pic.twitter.com/6IKL8xXGP0
— ANI (@ANI) July 16, 2025
























