एक्स्प्लोर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस देवी प्रसाद त्रिपाठी यांचे निधन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी खासदार डी.पी.त्रिपाठी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 67 वर्षांचे होते. आज दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पूर्ण नाव देवी प्रसाद ठाकूर असं आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस होते. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी खासदार डी.पी.त्रिपाठी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 67 वर्षांचे होते. आज दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पूर्ण नाव देवी प्रसाद ठाकूर असं आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस होते. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकून फार दुखः झालं आहे. ते पक्षाचे सरचिटणीस असून पक्षातील कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक होते.' पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'त्यांना सुज्ञ सल्ला आणि मार्गदर्शनासाठी लक्षात ठेवले जाईल. पक्ष स्थापन झाल्यापासून त्यांनी साथ दिली आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. या दुखःद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे.'
येचुरी यांनी डीपी त्रिपाठींच्या निधनानंतर व्यक्त केला शोक
सीताराम येचुरी यांनी डीपी त्रिपाठींच्या निधनानंतर शोक व्यक्त करत म्हणाले, त्यांनी विद्यार्थीदशेपासून सोबत असलेला अत्यंत जवळचा मित्र गमावला आहे. तसेच त्रिपाठींना श्रद्धांजली देणारं ट्वीटही त्यांनी केलं आहे.
जेएनयू विद्यार्थी संघाचे होते अध्यक्ष
29 नोव्हेंबर 1992 रोजी यूपीतील सुल्तानपूरमध्ये जन्म झालेले डी. पी. त्रिपाठी विद्यार्थी दशेत असताना जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (जेएनयू) मध्ये विद्यार्थी संघाचे अध्यक्ष होते. तसेच पॉलिटिकल सायन्सचे प्रोफेसर म्हणून अलाहाबाद विश्वविद्यालयात कार्यरत होते.
राजीव गांधींचे सहाय्यक होते
डीपी त्रिपाठी वर्ष 1983 पासून 1999 पर्यंत काँग्रेस पार्टीचे सदस्य होते. 1983 ते 1991 पर्यंत राजीव गांधींचे सहाय्यक म्हणून काम करत होते. 1999 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement