(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navy commando dies: ...आणि आयुष्याचा प्रवास संपला, प्रशिक्षणादरम्यान जवानाचा विजेच्या तारेत अडकून मृत्यू
Navy commando dies: भारतीय नौसेनेचे जवान अंकुर शर्मा यांचा आग्र्यातील प्रशिक्षण केंद्रात मृत्यू झाला आहे. पॅरेशूटच्या प्रशिक्षणादरम्यान विजेच्या तारांमध्ये अडकून त्यांचा मृत्यू झाला आहे.
Navy commando dies: भारतीय नौसेनेतील (Indian Navy) जवानांसाठी हजारो फूट उंचावरुन पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारणे काही नवीन गोष्ट नाही आहे. बऱ्याचदा हे रोमहर्षक आणि घातक प्रकार आयुष्यावर देखील बेतू शकतात. आग्र्यात प्रशिक्षण घेणाऱ्या नौसेनेच्या एका जवानावार अशीच दुर्दैवी वेळ आली. आग्र्यातील प्रशिक्षण केंद्रात पॅराशूट प्रशिक्षण सुरु असताना विजेच्या तारांमध्ये अडकून भारतीय नौसेनेचे जवान अंकुर शर्मा (Ankur Sharma) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये पोस्टिंग, आग्र्यात प्रशिक्षण
मलपुरा पोलिस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुर शर्मा,हे जम्मू-काश्मीरमध्ये देशाची सेवा करत होते, ते आग्राच्या मलपुरा ड्रॉपिंग झोनच्या एअरबोर्न ट्रेनिंग स्कूलमध्ये पॅराशूटचे प्रशिक्षण घेत होते. आपल्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्यांनी शुक्रवारी सकाळी पॅराशूटच्या साहाय्याने विमानातून उडी मारली . परंतु उडी मारण्याच्या शेवटच्या क्षणी ते विजेच्या तारा पाहू शकले नाही. त्यामुळे तोल जाऊन त्यांचे पॅराशूट विजेच्या तारांमध्ये अडकले.
वृत्तानुसार, एका स्थानिक शेतकऱ्याने जावानाचे पॅराशूट विजेच्या तारांमध्ये अडकलेले पाहिले. त्याचवेळी त्या शेतकऱ्याने संबंधित अधिकाऱ्यांना त्याबद्दल कळवले. विजेच्या तारांमध्ये अडकल्यानंतर त्यांनी स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु उंचावरुन उडी मारली असल्यामुळे परिस्थिती बिकट होऊन बसली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग्रा येथील एअरबोर्न ट्रेनिंग स्कूल नियमितपणे नौसेनेच्या जवानांसाठी पॅराशूटचे प्रशिक्षण देते. ही संस्था हजारो कमांडोना पॅराशूट जंपचे प्रशिक्षण देते.
महेंद्र सिंह धोनीने देखील इथून घेतले प्रशिक्षण
क्रिकेटपटू आणि लेफ्टनंट कर्नल, महेंद्र सिंह धोनीने पॅराट्रूप्टरचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आणि मलपुरा ड्रॉपिंग झोनमध्ये पाच पॅराशूट जंप देखील केल्या आहेत केल्या.
Adm R Hari Kumar #CNS & all personnel of #IndianNavy pay tribute to Ankush Sharma, Petty Officer who lost his life whilst undergoing training exercise at Agra on 11 May 23 and extend heartfelt condolences to the bereaved family. pic.twitter.com/ImKyY9RXW8
— SpokespersonNavy (@indiannavy) May 12, 2023
याआधी पश्चिम बंगालमध्ये झाला होता जवानाचा मृत्यू
या आधी पश्चिम बंगालमध्ये अशाच एका जवानाचा पॅराशूट प्रशिक्षणादरम्यान मृत्यू झाला होता. पावागढ येथील प्रशिक्षण केंद्रातून ते प्रशिक्षण घेत होते.