एक्स्प्लोर
सिद्धू काँग्रेसच्या तिकिटावर पंजाब विधानसभेची निवडणूक लढवणार?
चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू आता विधानसभेसाठी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार, अशी माहिती आहे.
अमृतसर (शहर) विधानसभा मतदार संघातून सध्या सिद्धूंच्या पत्नी आमदार आहेत. त्यामुळे या मतदार संघातून आता सिद्धू काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. याच आठवड्यात सिद्धू काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही माहिती आहे.
सिद्धू काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांचा निवडणूक लढण्याचा निर्णयही अधिकृतपणे जाहीर केला जाईल. त्यामुळे सिद्धू यांच्या पत्नी म्हणजे नवज्योत कौर सिद्धू आता 2017 मध्ये निवडणूक लढवणार नसल्याचंही स्पष्ट झालं आहे.
नवज्योत कौर सिद्धू यांनी आज दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement