एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू
अमित शाह यांना स्वाईन फ्लू झाला आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबद्दल शाह यांनी स्वत: टि्वट करुन ही माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू झाला आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबद्दल शाह यांनी स्वत: टि्वट करुन ही माहिती दिली आहे. देवाचे आशिर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांनी लवकरच चांगला होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
नुकतेच पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. आगामी लोकसभा निवडणूक ही पानिपतच्या युद्धासारखीच आहे. पानिपतच्या युद्धात मराठे हरले, त्यानंतर भारताला 200 वर्षे गुलामीत काढावी लागली. आगामी निवडणुकांमध्ये नागरिकांनी नेता आणि नेतृत्त्व नसलेल्या पक्षाला मतदान केले तर देश पुन्हा काही वर्षे मागे जाईल". असे शाह यांनी म्हटले होते. शाह म्हणाले होते की, 2019 ची निवडणूक ही पानिपतसारखी लढाई आहे. ही लढाई भाजपने जिंकली तरच देशाचे भले होईल. नहीतर पुन्हा एकदा देश काही वर्षे मागे जाईल. मतदारांनी आगामी निवडणुकांमध्ये भरभरुन मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी लोकांना केले होते.मुझे स्वाइन फ्लू हुआ है, जिसका उपचार चल रहा है। ईश्वर की कृपा, आप सभी के प्रेम और शुभकामनाओं से शीघ्र ही स्वस्थ हो जाऊंगा।
— Amit Shah (@AmitShah) January 16, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement