Air India Flight Pee Case : टॉयलेटमध्ये सिगारेट प्यायला, नंतर महिलेच्या ब्लँकेटवर लघवी गेली, एअर इंडियाच्या फ्लाईटमधील दुसरी घटना
Air India Flight Pee Case : एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद पुरुष प्रवाशाने लघवी केल्याची घटना पुन्हा समोर आली आहे. या प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) विमानातील प्रवाशांसोबत असभ्य वर्तनावर कठोर भूमिका घेतली आहे
Air India Flight Pee Case : एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद पुरुष प्रवाशाने लघवी केल्याची घटना पुन्हा समोर आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एका व्यक्तीने महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली. या प्रकरणी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुरुष प्रवाशाने लेखी माफी मागितल्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाबाबत विमानतळ सुरक्षेकडून सांगण्यात आले की पुरुष प्रवाशाने मद्य प्राशन केले होते आणि तो केबिन क्रूच्या सूचनांचे पालन करत नव्हता. त्यानंतर त्याने मद्यधुंद अवस्थेत महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली. यानंतर दिल्लीत सीआरपीएफने त्याला पकडले पण दोन प्रवाशांमध्ये तडजोड झाल्यानंतर पुरुष प्रवाशाला सोडण्यात आले.
Air India Flight Pee Case : दहा दिवसांत दुसरी घटना
6 डिसेंबर रोजी एअर इंडियाच्या फ्लाइट 142 मध्ये लघवीची घटना घडली. विमानाच्या पायलटने याबाबत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्या पुरुष प्रवाशाला अटक करण्यात आली होती. परंतु महिलेची लेखी माफी मागितल्यानंतर कोणतीही एफआयआर नोंदवली नाही आणि त्याला सोडून देण्यात आले. यापूर्वी 26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटच्या बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने महिला सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शंकर मिश्रा या संशयिताला अटक देखील करण्यात आली आहे.
Air India Flight Pee Case : नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आक्रमक
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) विमानातील प्रवाशांसोबत असभ्य वर्तनावर कठोर भूमिका घेतली आहे. पॅरिस-नवी दिल्ली फ्लाइटमधील दोन घटनांबाबत डीजीसीएने एअर इंडियाला नोटीस पाठवली आहे असून याबाबत त्यांच्याकडून माहिती मागवली आहे.
Air India Flight Pee Case : डीजीसीएकडून एअर इंडियाला नोटीस
डीजीसीएने 5 जानेवारी 2023 रोजी झालेल्या घटनेची एअर इंडियाकडून माहिती मागितली होती. त्यापूर्वी कंपनीने कोणतीही माहिती दिली नव्हती. रेग्युलेटरने सांगितले की कंपनीने 6 जानेवारी रोजी एक ईमेल उत्तर पाठवले आणि त्याच प्रथमदर्शनी पाहिल्यावर असे आढळले की अनियंत्रित प्रवाशांच्या हाताळणीशी संबंधित तरतुदीचे पालन केले गेले नाही.
नियामकाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, एअरलाइनकडून कारवाई करण्यात हलगर्जीपणा आणि विलंब झाला. महासंचालनालयाने एअर इंडियाच्या संबंधित व्यवस्थापकाला नियमांचे पालन न केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का करू नये, यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन करून त्यांना उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली असून त्या आधारे पुढील कार्यवाही केली जाईल.
महत्वाच्या बातम्या