National Civil Service Day 2022: राष्ट्रीय लोक सेवा दिवस प्रथम 21 एप्रिल 2006 साली साजरा करण्यात आला होता. देशाच्या विकासात महत्वाचं योगदान देणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस साजरा केला जातो. या दिवशी सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पंतप्रधान पुरस्कारही दिला जातो.





 


राष्ट्रीय लोक सेवा दिवसाचा इतिहास
सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या हस्ते 21 एप्रिल रोजी अखिल भारतीय सेवांचे उद्घाटन करण्यात आलं. दिल्लीतील मेटकॅफ हाऊसमध्ये त्यांनी भूतकाळातील अनुभव मागं ठेवून लोक सेवकांच्या राष्ट्रीय सेवा चांगल्या प्रकारे करण्याच्या भावनेवर भाष्य केलं होतं. या दिवशी त्यांनी लोक सेवकांना देशाची 'स्टील फ्रेम' म्हणून संबोधित केलं होतं. आजच्या दिवशी 2006 मध्ये नागरी सेवकांसाठी एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी 21 एप्रिल हा राष्ट्रीय नागरी सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो.


राष्ट्रीय लोक सेवा अधिकारी कोणाला म्हणतात? 
भारतीय प्रशासकीय सेवा, ( IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS), भारतीय विदेश सेवा (IFS) आणि अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवा गट A आणि B च्या अधिकाऱ्यांना लोक सेवा अधिकारी म्हणतात. यामध्ये नियुक्तीसाठी लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. या सर्व परीक्षा भारतीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेतल्या जातात. निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रशिक्षण दिलं जातं.


आजच्या दिवशी नागरी सेवा अधिकाऱ्यांना गौरवण्यात येतं
राष्ट्रीय लोक सेवा दिवशी केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना त्यांच्याद्वारा वर्षभर केलेल्या कार्याबद्दल सन्मानित केलं जातं. या दिवशी सर्व अधिकारी एकत्रित येऊन भविष्यातील योजनांबद्दल आपलं मतं मांडतात. 


आजच्या दिवशी लोक सेवा अधिकार्‍यांच्या कार्याची आणि प्रयत्नांची प्रशंसा केली जाते. केंद्र सरकार नागरी सेवा अंतर्गत विविध विभागांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी या संधीचा वापर करते. आजच्या दिवशी बहुतेक केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना सार्वजनिक प्रशासनाच्या क्षेत्रातील त्यांच्या अपवादात्मक सेवेबद्दल भारताच्या पंतप्रधानांकडून सन्मानित केलं जातं.


हे देखील वाचा-