Important days in 16th April : एप्रिल महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 16 एप्रिलचे दिनविशेष. 


1889 : विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचा जन्म.


सर चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन, ज्युनियर, ऊर्फ चार्ली चॅप्लिन हे मूकपटांमध्ये अभिनय करणारे इंग्लिश अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार होते. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्यांची विशेष ख्याती होती. अभिनयासोबत ते मूकपटांचे लेखन, दिग्दर्शन सांभाळत असत. पहिल्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात ते जगभरातल्या सर्वांत प्रसिद्ध सिनेताऱ्यांपैकी एक होते.


सन 1919 साली पंजाब मधील अमृतसर येथे झालेल्या जालीयनवाला बाग हत्याकांड प्रकरणी निधन पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली देण्यासाठी महात्मा गांधी यांनी आजच्या दिवशी उपवास करण्याची घोषणा केली होती.


1922 : मुळशी सत्याग्रह सुरू झाला.


मुळशी सत्याग्रहाची सुरुवात 16 एप्रिल 1921 रोजी राम नवमीच्या दिवशी झाली. मुळशी पेट्यात 95 वर्षांपूर्वी धरण बांधण्याचा निर्णय झाला. त्‍यात आपल्या जमिनी, घरे, श्रद्धास्थाने, त्याचबरोबर संस्कृतीही बुडणार, या कल्पनेने येथील शेतकरी हादरला. पुण्यातील पत्रकार विनायकराव भुस्कुटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सत्याग्रहाचा लढा उभारला. पांडुरंग महादेव बापट यांनी त्‍याचे नेतृत्व केले. त्यातून ‘सेनापती’ ही उपाधी त्यांना देण्यात आली. प्रचंड मोठा भांडवलदार आणि इंग्रज सरकारपुढे हा संघर्ष टिकला नाही. अखेर धरण झाले. त्‍यात 52 गावे आणि हजारो एकर सुपीक गेली.


1948 : राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली.


NCC ची स्थापना 16 एप्रिल 1948 रोजी झाली. हे UTC आणि UOTC एकत्र करून तयार केले गेले. NCC दिवस नोव्हेंबरच्या चौथ्या रविवारी साजरा केला जातो. एनसीसी दिनाचा भाग म्हणून शाळा-शाळांमध्ये परेडचे आयोजन केले जाते.


1972 : केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-16 या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.


1978 : मॉडेल आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री लारा दत्ताचा जन्मदिन. 


लारा दत्ता ही एक भारतीय अभिनेत्री आहे. माजी विश्वसुंदरी असलेल्या लारा दत्ताने 2000 साली फेमिना मिस इंडिया आणि मिस युनिव्हर्स ह्या सौंदर्य स्पर्धा जिंकल्या होत्या. तिने 2003 साली अंदाज ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. लाराने आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले असून भागम् भाग, पार्टनर या चित्रपटांतील लाराची भूमिका लक्षणीय ठरली. 


2008 - लंडनमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.


जागतिक आवाज दिन : दरवर्षी 16 एप्रिल या दिवशी जागतिक आवाज दिन साजरा करतात. 2020 साली हा दिवस ‘फोकस ऑन युवर वॉइस’ या संकल्पनेखाली साजरा केला गेला. दैनंदिन जीवनात लोकांच्या आवाजाचे महत्त्व दर्शविण्यासाठी हा दिवस साजरा करतात.


महत्वाच्या बातम्या :