Health tips : आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या पद्धतीवर होतो. मोठ्या शहरांमध्ये लोक रात्रीच्या शिफ्टमध्ये उशिरापर्यंत काम करतात. यासोबतच लोकांना रात्री उशिरा जेवण्याची सवयही लागली आहे. रात्री उशिरा येणारी भूक शांत करण्यासाठी अनेक वेळा लोक हॉटेलमधून जेवण ऑर्डर करून खातात. बहुतेकदा असे दिसून आले आहे की रात्रीचे लोक फास्ट फूड किंवा जंक फूड खाणे पसंत करतात. त्यामुळे अनेक वेळा शरीराला खूप नुकसान होते. रात्री खाल्ल्याने आपल्या शरीरातील कॅलरीज वाढते. त्यामुळे शरीरात अनावश्यक चरबी जमा होते आणि आपले वजन वाढू लागते. रात्री उशिरा जेवण्याच्या सवयीमुळे कोणते नुकसान होऊ शकते हे जाणून घेऊयात.
रात्री उशिरा जेवण्याच्या सवयीमुळे या समस्या उद्भवू शकतात.
- उशिरा जेवणाची सवय - रात्री उशिरा जेवण केल्याने अनेकदा अॅसिडिटीचा त्रास होतो.
- यासोबतच कधी कधी छातीत जळजळही होऊ शकते. त्यामुळे जेवण उशिरा खाणे टाळा.
- आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा जेवण केल्याने पोटदुखी, गॅस, अपचन, छातीत जळजळ अशा समस्या होऊ शकतात.
- त्यामुळे मध्यरात्री अन्न खाणे टाळण्याचा प्रयत्न करा. यासोबतच रात्रीच्या वेळी आपल्या दैनंदिन जीवनशैलीत हलक्या अन्नाचा समावेश करा.
- जर काही कारणास्तव तुम्ही रात्री उशिरा जेवण करत असाल तर अशा स्थितीत अन्न हळूहळू चावून खा.
- यामुळे अन्न लवकरात लवकर पचते. यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप लागेल.
- रात्री उशिरा जेवल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, वजन वाढणे, नैराश्य, तणाव, झोपेच्या समस्या होऊ शकतात.
या वेळेपर्यंत रात्रीचे जेवण करणे योग्य :
तज्ज्ञांच्या मते, रात्री 7 ते 8 या वेळेत जेवण करावे. त्याच वेळी, रात्री 10 नंतर अन्न खाणे टाळावे. बऱ्याच आरोग्य तज्ज्ञांनी शिफारस केली आहे की एखाद्या व्यक्तीने झोपण्याच्या किमान दोन तास आधी रात्रीचे जेवण करावे. यामुळे रात्री चांगली झोप लागते आणि गॅस, अपचन आदी समस्या होत नाहीत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.