Jammu-Kashmir Earthquake : लडाखमध्ये 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप, जम्मू-काश्मीरमध्येही धक्के जाणवले
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलच्या उत्तर-पश्चिमेस 148 किलोमीटर अंतरावर होता.
Jammu-Kashmir Earthquake : केंद्रशासित प्रदेश लडाखमधील कारगिल जिल्ह्यात सोमवारी (19 फेब्रुवारी) रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलच्या उत्तर-पश्चिमेस 148 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली भूपृष्ठापासून 10 किलोमीटर खाली होती.
Earthquake of Magnitude:5.2, Occurred on 19-02-2024, 21:35:17 IST, Lat: 35.45 & Long: 74.93, Depth: 10 Km ,Location: 148km NW of Kargil, Laddakh, India for more information Download the BhooKamp App https://t.co/MFGkLzM4Lu@KirenRijiju @Dr_Mishra1966 @Indiametdept @ndmaindia pic.twitter.com/iZnl7HCS97
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) February 19, 2024
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कोणत्याही नुकसानीबाबत तत्काळ माहिती दिलेली नाही. रविवारी रात्रीपासून लडाखमध्ये अधूनमधून बर्फवृष्टी होत आहे. स्थानिक मीडियानुसार, श्रीनगरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. याआधी शुक्रवारी (16 फेब्रुवारी) जम्मू-काश्मीरच्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. शुक्रवारी श्रीनगर आणि गुलमर्गसह काही भागात 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत अनेकदा भूकंपाचे धक्के
13 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात 3.4 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू जमिनीत 5 किमी खोलीवर होता. यापूर्वी 4 जानेवारीलाही जम्मू-काश्मीरमध्ये 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
An earthquake of magnitude 5.2 occurred today at 21:35 pm in Kargil, Ladakh: National Centre for Seismology pic.twitter.com/XmAoqpqXyP
— ANI (@ANI) February 19, 2024
भूकंपाच्या वेळी कोणती खबरदारी घ्यावी?
भूकंप झाल्यास गोंधळ टाळा, टेबलाखाली आधार घ्यावा या काळात लिफ्ट वापरू नका. बाहेर पडताना इमारती, भिंती, झाडे, खांब इत्यादींपासून दूर राहा. हादरे बसताना तुम्ही वाहनात असाल, तर ते मोकळ्या जागी वाहन थांबवा आणि हादरे कमी होईपर्यंत आत बसून राहा.
इतर महत्वाच्या बातम्या