एक्स्प्लोर
Advertisement
डोनाल्ड, मलेनिया ट्रम्प आणि मोदींव्यतिरिक्त रेड कार्पेटवर दिसलेली ‘ती’ महिला कोण?
डोनाल्ड आणि मलेनिया ट्रम्प यांच्या स्वागतापासून नरेंद्र मोदींसोबत असलेलूी ती महिला कोण? जाणून घ्या....
मुंबई : जगातील महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी गुजरातमधील अहमदाबादमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. सहकुटुंब भारत दौऱ्यावर आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद विमानतळावर स्वागत केलं. मोदींनी ट्रम्प यांची गळाभेट घेतली.
सोमवारी डोनाल्ड आणि मलेनिया ट्रम्प यांच्या स्वागतापासून नरेंद्र मोदींसोबत असलेल्या एका महिलेची जोरदार चर्चा सुरु आहे. दौऱ्याच्या सुरवातीपासूनच मलेनिया ट्रम्प 'या' महिलेसोबत होत्या. दौऱ्याच्या पहिल्याचं दिवशी या महिलेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कोण आहे ही महिला आपण थोडक्यात जाणून घेऊया.
‘ती’ महिला कोण?
- डोनाल्ड आणि मलेनिया ट्रम्प यांच्यासोबत असलेल्या महिलचं नाव गुरदीप कौर चावला असे आहे.
- गुरदीप कौर चावला या पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अनुवादक (इंटरप्रिटर) काम करतात.
- गुरदीप गुरदीप कौर चावला या अमेरिकन ट्रान्सलेटर असोसिएशनच्या सदस्या आहेत.
- जेव्हा कधी पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर भाषण करतात तेव्हा गुरदीप या इंग्रजीत भाषांतर करतात.
- अनेकदा गुरदीप या पंतप्रधान मोदींसोबत परदेशी नेत्यांबरोबर दिसल्या आहेत.
- परदेशी पंतप्रधानांनी हिंदीत भाषण केल्यावर गुरदीप या त्याचं भाषातर करतात. यामुळे पंतप्रधानांचं भाषण परदेशी नेत्यांना समजण्यास मदत होते.
- गुरदीप यांनी 1990 साली भारतीय संसदेमधून अनुवादक म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली.
- 1996 साली लग्न झाल्यानंतर काही काळातच गुरदीप या आपल्या नवऱ्यासोबत अमेरिकेमध्ये स्थायिक झाल्या.
- 2014 साली मेडिसन स्वेअर गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमामध्ये गुरदीप उपस्थित होत्या. त्यांनी तिथे अनुवादक म्हणून कामं केलं होतं.
- या कार्यक्रमानंतरच गुरदीप या पंतप्रधानांच्या ताफ्याबरोबर वॉशिंग्टन डीसीला जात तेथे अनुवादकाचं काम केलं.
- गुरदीप या मुळच्या पंजाबच्या आहेत.
- गुरदीप यांना हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांचे उत्तम ज्ञान आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement