एक्स्प्लोर

बोगदा बनवून दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी; नगरोटा चकमकीनंतर सुरक्षा यंत्रणांचा मोठा खुलासा

गुरुवारी नगरोटाजवळ जम्मूमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेल्या जैशच्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा होता. त्यांच्याकडून 11 एके 47 रायफल आणि पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत.

श्रीनगर : नगरोटा चकमकीचा तपास करणार्‍या सुरक्षा यंत्रणांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांनी भारतात घुसण्यासाठी बोगद्याचा वापर केला असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. हे दहशतवादी पाकिस्तानच्या शकरगड येथून सांबा सेक्टरमध्ये बोगद्यातून घुसले. दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रे आणि बारूद पूर्वीपासूनचं ट्रकमध्ये असल्याचा संशय आहे.

सीमेवर असलेल्या ताराच्या कुंपणाला कोणतीही छेडछाड झाली नसल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. त्यामुळे सांबा सेक्टरमध्ये बोगद्यातून दहशतवादी घुसल्याचा विश्वास आहे. बोगदा बनवून दहशतवाद्यांनी सीमा ओलांडल्याची ही पहिली घटना नाही.

जम्मूमध्ये ठार झालेल्या जैश दहशतवादी मोठी योजना आखत होते

गुरुवारी नगरोटाजवळ जम्मूमध्ये झालेल्या चकमकीत ठाक झालेल्या जैशच्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा होता. त्यांच्याकडून 11 एके 47 रायफल्स आणि पिस्तूलही जप्त करण्यात आल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. मोठा घातपात करण्याची योजना हे दहशतवादी आखत असल्याची शक्यता आहे. हे चौघे काश्मीरकडे जाणाऱ्या ट्रकमधून प्रवास करत होते. टोल प्लाझाजवळ पोलिसांनी ट्रक थांबविला आणि त्यानंतर चकमकीत हे चौघे ठार झाले.

नगरोटा एन्काऊंटरनंतर पंतप्रधान मोदींकडून जवानांचे कौतुक, म्हणाले..

गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांना घेऊन जाणारा ट्रकला थांबवून ड्रायव्हरला विचारपूस केली असता त्यानं पळ काढायला सुरुवात केली. पोलिसांच्या पथकावर ट्रकच्या आतून गोळीबार झाला. मग प्रत्युत्तरात जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून 11 एके-47 रायफल आणि 3 पिस्तूल यांच्यासह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. प्रत्येक दहशतवादी कमीतकमी 3 एके-47 रायफल घेऊन जात होता. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर यंदाची ही दुसरी चकमकी होती. यापूर्वी जानेवारीमध्ये सुरक्षा दलाने 3 दहशतवादी ठार मारले होते. तेही अशाचप्रकारे ट्रकच्या आत लपून जात होते.

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
Akhilesh Yadav: प्रधानांना हटवून पंतप्रधानांना वाचवलं, दान चोरी रोखू न शकणारे पेपर लीक कसे रोखणार?:अखिलेश यादव
प्रधानांना हटवून पंतप्रधानांना वाचवलं, दान चोरी रोखू न शकणारे पेपर लीक कसे रोखणार?:अखिलेश यादव
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
CJI Suryakant on Delhi Police Lathicharge: आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता दिल्ली पोलिसांनाही हिशेब चुकता करावा लागणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून महत्त्वाचा आदेश
आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता दिल्ली पोलिसांनाही हिशेब चुकता करावा लागणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून महत्त्वाचा आदेश

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shalarath ID Fraud Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Gold Rate : गुड न्यूज,सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
Embed widget