(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagaland Killing : नागालँडमध्ये 30 जवानांवर आरोपपत्र दाखल, 13 नागरिकांच्या हत्येचा आरोप
Nagaland Killing News : नागालँडमध्ये 4 डिसेंबर 2021 मध्ये मोन जिल्ह्यात 13 नागरिकांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी आता ‘21 पॅरा स्पेशल फोर्स’च्या 30 जवानांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे
Charge Sheet Against Commando : नागालँडमध्ये (Nagaland) मोन जिल्ह्यात 13 नागरिकांची हत्या झाली होती. मोन जिल्ह्यातील (Mon District) ओटिंग-तिरू परिसरात (Oting Tiru Area) सैन्य दलाच्या एका मोहीमत सुमारे 13 नागरिकांची हत्या (13 People Killing) झाली होती. या प्रकरणी आता मेजर रँकचे (Major Rank) एक अधिकाऱ्यासह ‘21 पॅरा स्पेशल फोर्स’मधील 30 जवानांवर (Commando) आरोपपत्र (Charge Sheet) दाखल करण्यात आलं आहे. आरोपपत्र दाखल करण्याआधी करण्यात आलेल्या तपासात समोर आलं आहे की, विशेष दलाच्या मोहीम पथकाने (Special Force) ऑपरेशन दरम्यान कार्यप्रणाली आणि नियमांचे पालन केलं नाही आणि अंदाधुंद गोळीबार केला. परिणामी यामध्ये सहा नागरिकांचा तात्काळ मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले.
चुमौकेदिमा परिसरात पोलिसांनी शनिवारी पत्रकारांशी बातचीत करत नागालँडचे पोलीस महासंचालक (DGP) टी जॉन लोगकुमर यांनी सांगितलं की, तिजित पोलीस स्थानकातील प्रकरण ओटिंग येथील घटनेशी संबंधित आहे. यामध्ये अतिरेक्यांवर केलेल्या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला. 4 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या या घटनेत लोकांची चुकीची ओळख पटवण्यात आली.
एसआयटी पुरावे गोळा केले
राज्य गुन्हे पोलीस ठाण्यात 5 डिसेंबर रोजी भादंवि (IPC) कलम 302, 304 आणि 34 अंतर्गत लष्करातील व्यक्तींविरुद्ध पुन्हा गुन्हा नोंदवला आणि तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला आहे. एसआयटीने या प्रकरणात सखोल तपास करत सुत्रांकडून मिळालेली संबंधित महत्त्वाची कागदपत्रं आणि पुरावे गोळा केले. यामध्ये केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा (CFSL) गुवाहाटी, हैदराबाद आणि चंदीगड यांच्याकडील तांत्रिक पुरावे यांचा समावेश आहे. तपासादरम्यान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीकडून पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
30 जणांवर गुन्हा दाखल
पोलीस महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. यामध्ये 30 मे 2022 रोजी सहाय्यक सरकारी वकील, सोम यांच्यामार्फत जिल्हा आणि सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आलं. एक मेजर, दोन सुभेदार, आठ हवालदार, चार नाईक, सहा लान्स नाईक आणि नऊ पॅराट्रूपर्ससह '21 पॅरा स्पेशल फोर्स'च्या ऑपरेशन टीममधील 30 जणांविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
13 नागरिकांची हत्या
एका मेजर रँक ऑफिसरच्या नेतृत्वाखाली 21 पॅरा स्पेशल फोर्सच्या 31 जवानांच्या अल्फा टीमने नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (NSCN-K (YA) आणि आसामच्या युनायटेड लिबरेशन फ्रंटवर हल्ला केल्याचं तपासात उघड झालं आहे. ULFA (ULFA) कॅडरच्या संघटनेच्या परिसरात उपस्थितीबद्दल गुप्तचर माहितीनुसार, 3 डिसेंबर 2021 रोजी ओटिंग तिरू परिसरात एक ऑपरेशन सुरू करण्यात आलं. 4 डिसेंबर रोजी पहाटे 4:20 वाजता अप्पर तिरू आणि ओटिंग गावाच्या मध्यभागी लाँगखाओ येथे हल्ला करण्यात आला. तिथे उपस्थित असलेल्या '21 पॅरा स्पेशल फोर्स'च्या ऑपरेशन टीमने ओटींग गावातील आठ सामान्य लोकांना घेऊन जाणाऱ्या पांढऱ्या बोलेरो पिकअप वाहनावर गोळीबार केला. त्यापैकी बहुतेक तिरू येथील कोळसा खाणीत मजूर म्हणून काम करत होते. सैनिकांनी या लोकांची अचूक ओळख पटवली नव्हती किंवा हल्ल्यापूर्वी त्यांना आव्हान दिलं नव्हतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Jammu Kashmir : पुलवामामध्ये लष्कराला मोठं यश, तीन दहशतवाद्यांचा खात्मा, शोध मोहिम सुरु
- ड्रोन हल्ले अन् तस्करी रोखण्यासाठी भारताचा मोठा निर्णय, सीमेवर तैनात करणार अॅण्टी ड्रोन डॉग स्क्वॉड
- Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल भरायचंय? IOCL ने दिली महत्वाची माहिती, आजचे दर त्वरित तपासा