एक्स्प्लोर

आरबीआयनं स्वत:चं तयार केलेल्या समस्यांवर आता मोबाईल अॅपचा उतारा, हायकोर्टाचे खडेबोल

रिझर्व्ह बँकेने स्वतःच तयार केलेल्या अडचणींवर आता अॅपचा पर्याय आणला आहे, असेही खंडपीठाने सुनावले. अंध व्यक्तींना नैसर्गिकरित्या अन्य शारिरीक बाबींमध्ये अधिक क्षमता असते, अशावेळी चलनाचा आकार सतत बदलणे त्यांच्यासाठी त्रासदायक आहे, असंही हायकोर्ट म्हणाले.

मुंबई : 'ज्या राज्यात मागील एक महिन्यापासून मोबाईल-इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही, तिकडे रिझर्व्ह बँकेचे दिव्यांगांसाठी असलेलं मोबाईल अॅप काय उपयोगाचं? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं काश्मिरमधील परिस्थितीच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेला केला आहे. भारतीय चलनाचा आकार हा नोटांना 'वॉलेट स्नेही' म्हणजेच पाकीटात नोटा सहज ठेवता येतील यासाठी बदलण्यात आला आहे, असा दावा यावेळी आरबीआयच्यावतीनं करण्यात आला. रिझर्व्ह बँकेने स्वतःच तयार केलेल्या अडचणींवर आता अॅपचा पर्याय आणला आहे, असेही खंडपीठाने सुनावले. अंध व्यक्तींना नैसर्गिकरित्या अन्य शारिरीक बाबींमध्ये अधिक क्षमता असते, अशावेळी चलनाचा आकार सतत बदलणे त्यांच्यासाठी त्रासदायक आहे, असंही हायकोर्ट म्हणाले. नॅशनल असोसिएशन फोर ब्लाईंडच्या (नॅब)वतीनं करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. रिझर्व्ह बँकेने दिव्यांग व्यक्तींना नोटा ओळखण्यासाठी एक मोबाईल अॅप तयार केलं आहे. मात्र हे अॅप इंटरनेट नसताना वापरता येऊ शकतं का?, अशी विचारणा खंडपीठानं केली होती. कारण तंत्रज्ञानालाही मर्यादा असतात, जर एखाद्या व्यक्तीच्या मोबाईलला नेटवर्क नसेल किंवा त्याला एखाद्या विशिष्ट ठिकाणी मोबाईल वापरायला परवानगी नसेल तर अशावेळी काय करणार?, असा प्रश्‍न खंडपीठाने उपस्थित केला. यावेळेस त्यांनी काश्‍मिरचा संदर्भ अप्रत्यक्षपणे दिला. मुंबईतही अनेक ठिकाणी बऱ्याचदा नेटवर्क उपलब्ध नसते, त्यामुळे सोप्या पद्धतीने सुविधा मिळेल असं तंत्रज्ञान तयार करणं अत्यावश्‍यक आहे, हे तंत्रज्ञान किचकट असता कामा नये, असं न्यायालय म्हणाले. रिझर्व्ह बॅंकेच्यावतीनं कोर्टानं सांगितलं की, साल 1967 ते साल 2019 या कालावधीत केवळ एकदाच, साल 2018 मध्ये नोटांचा आकार बदलण्यात आला आहे. तसेच हा आकार 'वॉलेट-स्नेही 'असावा, या उद्देशाने चलनाचा आकार बदलण्यात आला आहे, परदेशातही अशाप्रकारची पद्धती आहे. शंभर रुपयांच्या चलनातील बदल त्याचे स्वरुप ओळखता यावे म्हणून करण्यात आला. मात्र दहा-वीस रुपयांमध्ये असा बदल नाही केला कारण ते जास्त वापरात आहे, असेही त्यांनी सांगितले. याचिकेवरील सुनावणी शुक्रवारीही सुरू राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Embed widget