एक्स्प्लोर
तीन वेळा तलाक घेण्याच्या पद्धतीला 50 हजार मुस्लिम महिलांचा विरोध
नवी दिल्ली : तीन वेळा तलाक घेण्याच्या पद्धतीला जवळपास 50 हजार मुस्लिम महिलांचा विरोध आहे. याबाबत महिलांनी न्यायालयात धाव घेऊन जनहीत याचिका दाखल केली आहे. ही याचिका 'भारतीय मुस्लिम महिला आंदोलन'च्या वतीने दाखल करण्यात आली असून राष्ट्रीय महिला आयोगाने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
भारतीय मुस्लिम महिला आंदोलनच्या संस्थापिका झाकिया सोमान यांनी गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, ओडिसा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, केरळ आणि उत्तरप्रदेशात या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली आहे.
या संदर्भात माहिती देताना सोमान म्हणाल्या की, तीन वेळा तलाक ही वाईट प्रथा बंद व्हावी यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. ललिता कुमारमंगलम यांना एक निवेदन देण्यात येणार आहे. यावर निवेदनावर 50 हजार मुस्लिम स्त्री-पुरुषांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तीन वेळच्या तलाक पद्धतीमुळे अनेक महिलांच्या आयुष्याची वाताहत होते. या पद्धतीमुळे महिलांना पोटगी देखील मिळत नाही. त्यामुळे 92 % महिला याच्या विरोधात असल्याचा निष्कर्ष भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या संशोधनातून समोर आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement