एक्स्प्लोर

मुंबईतील तरुणाला ड्रग्स प्रकरणी गोव्यात अटक

हणजुणे येथे ड्रग्सची प्रयोगशाळाच चालवणाऱ्या विदेशी नागरिकाच्या मुसक्या आवळल्यानंतर तिथून जवळच असलेल्या कळंगुटमध्ये पोलिसांनी छापा टाकून मुंबईच्या तरुणाला ड्रग्स विक्री प्रकरणी गजाआड केले.

पणजी : गोव्यात पर्यटन हंगाम ऐन भरात असताना ड्रग्सचा काळा धंदा सुद्धा तेजीत आला आहे. उत्तर गोव्यातील किनारे ड्रग्स व्यवसायाच्या सावटाखाली असून पोलिसांच्या कारवाया सुरु असताना देखील त्याला लगाम बसताना दिसत नाही. हणजुणे येथे ड्रग्सची प्रयोगशाळाच चालवणाऱ्या विदेशी नागरिकाच्या मुसक्या आवळल्यानंतर तिथून जवळच असलेल्या कळंगुटमध्ये पोलिसांनी छापा टाकून मुंबईच्या तरुणाला ड्रग्स विक्री प्रकरणी गजाआड केले.
कळंगुट पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुंबईतील 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. रीगन कुटो असं त्या तरुणाचे नाव असून तो अंधेरीचा रहिवासी आहे.  30 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत ही अटक करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाकडून 60 हजार रुपये किंमतीचे ड्रग्स जप्त केले आहे. हा तरुण कळंगुट परिसरात ड्रग्सची विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजताच उपनिरीक्षक महेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. रीगन कुटो परिसरात दाखल होताच पोलिसांनी त्याला पकडले.
कुटोची झडती घेतली असता त्याच्याजवळ ड्रग्स सापडले. त्यामध्ये 30 हजार रुपये किंमतीचे चरस तसेच 30 हजार रुपये किंमतीचे एमडीएमके मिळून 60 हजार रुपये किंमतीचे ड्रग्स ताब्यात घेण्यात आले आहेत. उद्या, शनिवारी रीगनला रिमांडासाठी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
PM Modi Gujarat Speech : सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Embed widget