एक्स्प्लोर

मुंबई नव्हे तर दिल्लीच देशाची आर्थिक राजधानी?

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेली आपली मुंबई आता मागे पडली आहे. कारण 'ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स'ने केलेल्या सर्व्हेत दिल्लीने आगेकूच केली आहे. 'ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स'ने जगातील 50 आर्थिक महानगरांचा सर्व्हे केला. यामध्ये राजधानी दिल्ली 30 तर मुंबई 31 व्या क्रमाकांवर राहिली. सर्व्हेनुसार, दिल्ली म्हणजे NCR मध्ये गुडगांव, नोएडा, गाझियाबाद आणि फरिदाबादसारखी शहरं मिळून, दिल्ली-एनसीआरचा (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) जीडीपी 370 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 2 लाख 54 हजार कोटी रुपये आहे. तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या शहरात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, भिवंडी आणि पनवेल यांचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्र अर्थात MMR मधील या शहरांचा एकत्रित जीडीपी 368 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 2 लाख 52 हजार कोटी रुपये इतका आहे. असं असलं तरी मुंबईची लोकसंख्या ही दिल्ली एनसीआरच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे तसं पाहिल्यास दरडोई उत्पन्नामध्ये मुंबई दिल्लीपेक्षा पुढे आहे. मुंबईकरांचं दरडोई वार्षिक उत्पन्न सरासरी 16881 डॉलर, म्हणजेच 11 लाख 60 हजार रुपये आहे. तर दिल्लीचं दरडोई वार्षिक उत्पन्न सरासरी 10 लाख 80 हजार आहे. सर्व्हेनुसार, 2030 मध्ये मुंबई आणि दिल्ली या शहरांचा जगातील बड्या आर्थिक केंद्रांमध्ये समावेश असेल. 'ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स'च्या मते 2030 मध्ये दिल्ली 11 व्या तर मुंबई 14 व्या क्रमांकावर असेल. दरम्यान, 'ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स'ने हा दावा केला असला तरी, मुंबई केवळ जीडीपीमुळे देशाची आर्थिक राजधानी ठरत नाही. मुंबईत रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय, मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचं मुख्यालय, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, बँकांची मुख्यालयं, अनेक देशांची व्यापारी वकिलाती मुंबईत आहेत. याशिवाय हिरे आणि सोनेबाजाराचं केंद्र म्हणून मुंबईची ओळख आहे. त्यामुळे मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Accident : भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte On Suresh Dhas भाजप नेत्यांनी सुरेश धसांना समज द्यावा, त्यांच्यावर हक्कभंग आणावाABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 31 January 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सAhilyanagar Leopard Rescue : 80 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला 'असं' केलं रेस्क्यू!ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Accident : भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Bhagwangad Namdev Shastri: ज्यांनी संतोष देशमुखांना मारलं, त्यांची मानसिकताही विचारात घ्यायला हवी, धनंजय मुंडेंची पाठराखण करताना नामदेवशास्त्री काय म्हणाले?
ज्यांनी संतोष देशमुखांना मारलं, त्यांची मानसिकताही विचारात घ्यायला हवी, धनंजय मुंडेंची पाठराखण करताना नामदेवशास्त्री काय म्हणाले?
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Embed widget