एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन दर 20 मिनिटांनी धावणार
ताशी 320 किलोमीटर वेगाने धावणारी बुलेट ट्रेन साधारण दोन तासात मुंबई-अहमदाबाद हे अंतर पार करेल.
मुंबई : बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दृष्टीपथात असल्याचं दिसत आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण जमिनीच्या अधिग्रहणासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ताशी 320 किमी वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे सात तासांचं अंतर अवघ्या दोन तासांत पूर्ण होणार आहे.
प्रस्तावित मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन गर्दीच्या वेळेमध्ये (सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 9 पर्यंत) दर 20 मिनिटांनी धावणार आहे. पिक अवर्समध्ये या मार्गावर तीन बुलेट ट्रेन धावतील तर उर्वरित वेळेमध्ये दोन ट्रेन धावण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर रोज या ट्रेनच्या 70 फेऱ्या होतील.
ताशी 320 किलोमीटर वेगाने धावणारी बुलेट ट्रेन साधारण दोन तासात मुंबई-अहमदाबाद हे अंतर पार करेल. सध्या इतर ट्रेन्सनी हे अंतर पार करण्यासाठी सात तास, तर विमानाने एक तास वेळ लागतो.
या मार्गावर 12 स्थानकं असतील – बीकेसी, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आणंद, साबरमती आणि अहमदाबाद.
एनएचएसआरसीएल हाय स्पीड आणि स्लो अशा दोन ट्रेन चालवणार आहे. हाय स्पीड ट्रेन मुंबई, सुरत, बडोदा आणि अहमदाबाद या स्थानकांवरच थांबेल तर स्लो ट्रेन सर्व 12 स्थानकांवर थांबेल.
मुंबई-अहमदाबाद मार्गावर विमानाने दररोज जवळपास 4 हजार 700 जण प्रवास करतात, तर 500 प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. या शिवाय जवळपास 15 हजार जण कारने प्रवास करतात. दोन्ही शहरांमध्ये बुलेट ट्रेनमुळे 40 हजार जणांना प्रवास करता यावा, अशी योजना आहे.
तिकीटदर दीडपट
सध्या मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या राजधानी किंवा शताब्दी एक्स्प्रेसपेक्षाही दीडपटीने भाडे जास्त ठेवण्यावर विचार केला जात आहे.
24 बुलेट ट्रेन
बुलेट ट्रेन प्रकल्पात 24 ट्रेन्स येणार आहेत. सुरुवातीला एक किंवा दोन बुलेट ट्रेन जपानमधून येतील. तर अन्य ट्रेन जपानच्या सहकार्याने भारतातच बनवण्यात येणार आहेत. दहा डब्यांच्या ट्रेनची आसन व्यवस्था 750 इतकी असेल. तर 16 डब्यांच्या गाडीत 1250 आसनं असतील.
2023 सालापर्यंत 10 डब्यांची गाडी येईल आणि 16 डब्यांची गाडी 2033 पर्यंत येणार आहे. यामध्ये बिझनेस आणि स्टँडर्ड अशा दोन श्रेणी असतील.
कोणकोणत्या सुविधा
उत्तम दर्जाची आसन व्यवस्था
महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहं
प्रवासी आजारी असल्यास आरामासाठी स्वंतत्र छोटी खोली.
डब्यात सीसीटीव्ही, आपत्कालीन इंटरकॉम यंत्रणा
स्वयंचलित ट्रेन नियंत्रण यंत्रणा
स्वयंचलित ब्रेक यंत्रणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement