Mulayam Singh Yadav Health : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती बिघडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती चिंताजनक असून उपचारासाठी त्यांना दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर नरेश त्रेहान हे मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
मुलायमसिंह यादव हे सध्या 82 वर्षांचे असून गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सतत खालावत आहे. प्रकृती ठिक नसल्याने जूनमध्ये त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्यार हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. परंतु, आज दुपारी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने आयसीयूमध्ये हलवण्यात आले. तपासणीत त्यांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाब कमी झाल्याचे आढळून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मेदांताचे वरिष्ठ डॉक्टर नरेश त्रेहान स्वतः मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीची देखरेख करत आहेत. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आल्याची माहिती डॉ. नरेश त्रेहान यांनी दिली.
मुलायम सिंह यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाल्यानंतर अखिलेश यादव आणि डिंपल यादव मेदांता रुग्णालयात पोहोचले आहेत. यासोबतच शिवपाल सिंह यादवही मेदांता हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहे. मुलायम सिंह यांच्या ओरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन शिवपाल यादाव यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. "मुलायम सिंह यादव मेदांता रुग्णालयात दाखल आहेत. माहिती मिळाळ्यानंतर त्यांना भेटण्यासाठी आम्ही दिल्लीला आलो आहोत. सर्वांनी नेताजींच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन शिवपाल यादव यांनी केले आहे.
मुलायम सिंह यांना पोटदुखीचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना या पूर्वी देखील अनेक वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही मुलायम सिंह यांना पोटदुखीच्या तक्रारीनंतर मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या