IRCTC Goa Package : सध्या सणासुदीचा काळ आहे. ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या येत आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जर तुम्ही गोवा सुट्ट्यांचा प्लॅन करत असाल, तर IRCTC ने खिशाला परवडणारं असं भन्नाट पॅकेज आणलं आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत किंवा मित्रमंडळींसोबत गोवा फिरण्याचा प्लॅन करु शकता आणि ते ही खिशाला अधिक ताण न देता. IRCTC ने स्वस्त गोवा टूर पॅकेज सुरु केलं आहे. 


गोवा टूर पॅकेज


IRCTC चं हे गोवा पॅकेजचे नाव  'गोवा डिलाइट' आहे. हे पॅकेजमध्ये तीन रात्री आणि चार दिवसांचं आहे. या टूर पॅकेजमध्ये उत्तर गोवा, दक्षिण गोवा समाविष्ट आहे. ही टूर 24 नोव्हेंबर 2022 रोजी हैदराबादपासून सुरू होईल आणि तुम्हाला अनेक ठिकाणांवर घेऊन जाईल.
 
गोवा टूर पॅकेजची वैशिष्ट्ये काय आहेत?


या पॅकेजमधील तुम्हाला प्रवासासाठी फ्लाईटची सोय, राहण्यासाठी 3 स्टार हॉटेलची सुविधा असेल. तसेच, फिरण्यासाठी एसी वाहनाची सुविधा या पॅकेजमध्ये देण्यात आली आहे. त्याचबरोबर या पॅकेजमध्ये तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही मिळत आहे.
 
IRCTC च्या टूर पॅकेजने स्वस्तात फिरा गोवा


जर तुम्हाला या ट्रिपमध्ये एकट्याने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला या पॅकेजसाठी 27 हजार 330 रुपये मोजावे लागतील. तर दोन लोकांसाठी हे प‌ॅकेज प्रति व्यक्ती 21 हजार 455 रुपये दराने हे पॅकेज उपलब्ध असेल. जर तुम्हाला तीन लोकांसोबत IRCTC च्या गोवा पॅकेज टूरला जात असाल तर त्याचा खर्च कमी असेल. तीन जणांसाठी IRCTC चे गोवा टूर पॅकेज प्रत्येकी 20 हजार 980 रुपयांना उपलब्ध असेल. जर तुमच्यासोबत लहान मुले असतील तर त्यांसाठी स्वतंत्रपणे शुल्क आकारलं जाईल. 
 
कसे बुक करावे?


तुम्ही विलंब न करता हे IRCTC चे गोवा टूर पॅकेज बुक करू शकता. यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन बुकिंग करु शकता. IRCTCच्या वेबसाईटवर तुम्हाला या पॅकेजची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. यासोबतच तुम्ही IRCTC च्या टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटरमधूनही बुकिंग करू शकता आणि तुमची गोवा टूर IRCTC सह अविस्मरणीय बनवू शकता.


महत्त्वाच्या इतर बातम्या