Gujarat ABP C-Voter : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीची लवकरच घोषणा होणार आहे. सध्याच्या सरकारचा कालावधी डिसेंबरमध्ये संपणार आहे. त्यापूर्वी निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच गुजरातमधील राजकीय वातावरण तापलेय. भाजप, काँग्रेस आणि आप पक्षानं कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा गुजरात दौरा केलाय. अरविंद केजरीवालही गुजरात दौऱ्यावर जात आहेत. गुजरातमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमधील लोकांचा कौल काय आहे? येथील लोकांना काय वाटतं? निवडणुकीत कोणता मुद्दा गाजणार? याबाबत लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी एबीपी न्यूजने सी व्होटरच्या मदतीनं सर्व्हे केला आहे. पाहूयात या सर्व्हेमध्ये लोकांनी कसा कौल दिला आहे...


गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीत कोणता मुद्दा प्रभावी ठरणार? 
ध्रुवीकरण -18%
राष्ट्रीय सुरक्षा-28%
मोदी-शाह यांचं काम-15%
राज्य सरकारचं काम-16%
आम आदमी पार्टी -18%
इतर -5 %


गुजरातमध्ये विधानसभा निवडणुक कोण जिंकणार?  जनतेनं कुणाला दिला कौल?
भाजप-63%
काँग्रेस-9%
आप-19%
अन्य-2%
त्रिशंकु-2%
माहित नाही-5%



किती गुजराती लोकांना सत्तांतर हवे आहे? लोकांनी काय सांगितलं?
नाराज आहे, सत्तांतर हवेय  -34%
नाराज आहे, सत्तांतर नको -40%
नाराज नाहीत, सत्तांतरही नकोय -26%


गुजरातच्या लोकांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी कसं काम करत आहेत?  काय आहे लोकांचा कौल
चांगलं -60%
सरासरी -18%
खराब-22%


मुख्यमंत्र्यांचं काम कसे आहे? काय म्हणतेय जनता
चांगलं -36%
सरासरी- 35%
खराब- 29%


राज्य सरकारचं कामकाज कसं आहे? लोकांनी काय सांगितलं
चांगलं -42%
सरासरी -26%
खराब-32%


गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कोणता?   
बेरोजगारी - 31%
महागाई - 8%
पायाभूत सुविधा - 16%
कोरोनातील काम -4%
शेतकरी -15%
न्याय व्यवस्था -3%
भ्रष्टाचार -7%
राष्ट्रीय मुद्दा -3%
इतर -13%


गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा दोन दिवसात होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये राजकीय वातारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि काँग्रेससह केजरीवाल यांच्या आप पक्ष सुद्धा जोरदार प्रचार करत आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी सी व्होटरनं गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यामध्ये ओपिनिअन पोल केला आहे. दोन्ही राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये सर्व्हे करम्यात आला आहे. यामध्ये 65 हजार 621 लोकांनी मत नोंदवली आहेत. या सर्व्हेमध्ये मार्जिन आणि एरर प्लस मायनस तीन ते पाच टक्के असेल.


आणखी वाचा :


ABP C-Voter Survey: हिमाचल प्रदेशमध्ये भाजप पुनरागमन करणार का? जाणून घ्या लोकांचा कल