ABP CVoter Opinion Poll: लवकरच गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकीची घोषणा होणार आहे. या दोन्ही राज्यातिल सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपणार आहे. त्याआधी सी व्होटरने दोन्ही राज्यांमध्ये एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केले आहे. दोन्ही राज्यातील सर्व विधानसभा जागांवर सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी दोन्ही राज्यांतील 65 हजार 621 लोकांशी संवाद साधून त्यांचं मत जाणून घेतलं आहे. 


एबीपी न्यूजने हिमाचल प्रदेशातील जनतेशी संवाद साधला आणि त्यांना प्रश्न विचारला की हिमाचल प्रदेशातील राज्य सरकारचे कामकाज कसे चालते? या प्रश्नावर 33 टक्के लोकांनी चांगले म्हटले आहे. तर 30 टक्के लोकांनी ठीक सुरु असल्याचं म्हटलं आहे आणि 37 टक्के लोकांनी वाईट सुरु असल्याचं म्हटले आहे.


हिमाचलचा ओपिनियन पोल राज्य सरकारचा कारभार कसा आहे?



  • चांगला - 33%

  • ठीक  - 30%

  • वाईट - 37%


मुख्यमंत्र्यांचे काम कसे आहे?



  • चांगले - 33%

  • ठीक - 32%

  • वाईट - 35%


सरकार बदलायला हवे का?



  • होय - 45%

  • नाही - 33%

  • तटस्थ - 22%


आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाचा विजय होणार?  



  • भाजप - 46%

  • काँग्रेस - 36%

  • आप - 8%

  • इतर - 2%

  • त्रिशंकू - 3%

  • माहित नाही - 5%


दरम्यान, गुजरात आणि हिमाचल या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. भाजप सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर काँग्रेस भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या दोघांमध्ये सत्ता संघर्ष सुरु असतानाच यात आम आदमी पक्षही सक्रिय झाला आहे. अरविंद केरीवाल हे सातत्याने दोन्ही राज्यांचे दौरे करत आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. 2017 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये 9 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते आणि 18 डिसेंबर 2017 रोजी निकाल जाहीर झाले होते. येथील 68 जागांपैकी भाजपने 44 जागा जिंकत राज्यात सरकार स्थापन केली. तर काँग्रेसला 21 जागांवर समाधान मानावं लागलं होत. यावेळी भाजप आणि काँग्रेसशिवाय आम आदमी पक्षही निवडणुकीत जोर लावत आहे.