एक्स्प्लोर

मुकेश अंबानींची एकुलती एक मुलगी ईशाचं लग्न ठरलं

पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंदसोबत तिचा विवाह होणार आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये भारतातच हा विवाहसोहळा होईल.

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशाचं लग्न ठरलं आहे. पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंदसोबत तिचा विवाह होणार आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये भारतातच हा विवाहसोहळा होईल. ईशा अंबानी आणि आनंद पिरामल अनेक वर्षांपासून मित्र आहेत. शिवाय अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांचे गेल्या चार दशकांपासून मैत्रीचे संबंध आहेत. हेच मैत्रीचे संबंध आता नात्यांमध्ये बदलणार आहेत. कोण आहेत आनंद पीरामल? आनंद पिरामल देशातील प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या पिरामल रिअल्टीचे कार्यकारी संचालक आहेत. यापूर्वी त्यांनी ग्रामीण आरोग्य क्षेत्रात पाऊल ठेवत ‘पिरामल स्वास्थ्य’ची सुरुवात केली होती. ‘पिरामल स्वास्थ्य’कडून आज एकाच दिवसात तब्बल 40 हजारपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केला जातो. आनंद पिरामल इंडियन मर्चंट चेंबरच्या युवा विंगचे सर्वात कमी वयाचे अध्यक्षही होते. आनंज पिरामल यांनी पेंसिल्वेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात ग्रॅज्युएशन केलं आहे. तर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवली. सर्वात श्रीमंत उद्योगपतीची एकुलती एक मुलगी ईशा 26 वर्षीय ईशा अंबानी रिलायन्स जिओ आणि रिटेल बोर्डाची सदस्य आहे. तिने प्रसिद्ध येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि दक्षिण आशिया अभ्यासात ग्रॅज्युएशन केलं आहे. ईशा याच वर्षी स्टॅण्डफोर्डच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमध्ये बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर पूर्ण करणार आहे. लग्नाचा प्रस्ताव कसा आला? अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांचे मैत्रीचे संबंध होते. शिवाय ईशा आणि आनंद यांचीही मैत्री होती. या मैत्रीचं रुपांतर नात्यामध्ये करायचं होतं. यासाठी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील एका मंदिराची निवड करण्यात आली. लग्नाचा प्रस्ताव पिरामल कुटुंबीयांकडून आला. आनंद पिरामल यांनी महाबळेश्वरच्या मंदिरात ईशाला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि हा प्रस्ताव दोन्हीही कुटुंबीयांनी मान्य केला. यावेळी अंबानी आणि पिरामल कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. लग्नाची बोलणी झाल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी सोबत जेवण केलं. संबंधित बातम्या :

अंबानींच्या घरी लग्नाची धामधूम, अँटिलियात ग्रॅण्ड पार्टी

मुकेश अंबानींच्या मुलाचा गोव्यात प्री एंगेजमेंट सोहळा

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget