एक्स्प्लोर
मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाबुलाल गौर यांचं महिलेशी असभ्य वर्तन

भोपाळ : मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौर यांच्यावर त्यांच्याच पक्षातल्या महिला कार्यकर्तीची छेड काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गौर यांच्या आक्षेपार्ह वर्तनाचा व्हिडिओही कैद झाला आहे. भोपाळमध्ये पालिकेच्या बसच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री महोदयांनी बसमध्ये चढणाऱ्या महिलेशी अश्लील वर्तन केल्याचं म्हटलं जात आहे. बसमध्ये संबंधित महिला चढत असताना बाबूलाल गौर यांनी छेड काढल्याचा आरोप आहे. दरम्यान बसमध्ये चढताना गर्दी होती. त्यामुळे आपण महिलांना चढण्यास सांगत होतो. मात्र आपल्यावर महिलेची छेड काढल्याचा आरोप केला जात आहे, असा दावा बाबूलाल गौर यांनी केला आहे. पाहा व्हिडिओ :
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?






















