एक्स्प्लोर

IIT Delhi in Abu Dhabi : अबुधाबीत होणार IIT दिल्लीचे पहिले संकुल, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या

IIT Delhi in Abu Dhabi : अबुधाबी मध्ये आयआयटी दिल्लीचे (IIT Delhi) पहिले संकुल स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे.

IIT Delhi in Abu Dhabi : अबुधाबी मध्ये आयआयटी दिल्लीचे (IIT Delhi) पहिले संकुल स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. हा करार शिक्षण मंत्रालय आणि अबुधाबीचा शिक्षण आणि ज्ञान विभाग (ADEK) यांच्यात करण्यात आला आहे. अबुधाबी येथील आयआयटी दिल्लीचे संकुल ज्ञानाच्या सामर्थ्याचा लाभ घेण्यासाठी एक पूर्णपणे नवी ओळख प्रस्थापित करेल. तसेच भारताच्या शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा एक नवा अध्याय सुरू करेल असे मत केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकासमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी व्यक्त केलं. 

दोन्ही देशामधील ज्ञानाची देवाणघेवाण वाढणार 

यूएईचे अध्यक्ष शेख  मोहम्मद बिन झायेद अल नह्यान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अडेकचे अंडर सेक्रेटरी मुबारक हमद अल मेहिरी आणि यूएईमधील भारतीय राजदूत सुंजय सुधीर आणि आयआयटी दिल्लीचे संचालक प्रोफेसर रंगन बॅनर्जी यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. सध्या सुरु असलेल्या यूएई-भारत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराला (CEPA) बळ देणाऱ्या या सामंजस्य करारातून दोन्ही देशांमधील शिक्षणाची उत्कृष्टता आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढणार आहे. तसेच दीर्घकालीन आर्थिक वृद्धी आणि शाश्वत विकासाचे कारक म्हणून मानवी भांडवलातील गुंतवणूक यांना प्राधान्य देण्याचा दृष्टीकोन प्रतिबिंबित होत आहे.

 देशाच्या शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा एक नवा अध्याय

अबुधाबीमध्ये आयआयटी दिल्लीचे पहिले संकुल उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य करारामुळे भारताच्या शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा एक नवा अध्याय सुरू होत असल्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवभारताचा नवोन्मेष आणि प्रावीण्य यांचा दाखला देणारे आयआयटी दिल्लीचे यूएईमधील संकुल हे भारत-यूएई मैत्रीचा नवा अंक असेल असेही प्रधान म्हणाले. अबुधाबीमधील आयआयटी दिल्लीचे संकुल परस्परांची समृद्धी आणि जागतिक कल्याण या दोहोंसाठी ज्ञानाच्या सामर्थ्याचा लाभ देणारी एक पूर्णपणे नवी ओळख प्रस्थापित करेल, असे त्यांनी सांगितले. यामुळं भारताच्या शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा एक नवा अध्याय देखील सुरु होत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

आयआयटी दिल्ली- अबुधाबी ही संस्था मोहम्मद बिन झायेद युनिवर्सिटी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, खलिफा युनिर्वसिटी, न्यूयॉर्क युनिवर्सिटी अबुधाबी, टेक्नॉलॉजी इनोवेशन इन्स्टिट्युट आणि हब 71 यांसारख्या प्रमुख संस्थांच्या सहकार्याच्या माध्यमातून पूरक कार्यक्रम उपलब्ध करेल. तसेच अत्याधुनिक संशोधन सुविधा उपलब्ध करण्यात येतील. स्थानिक स्टार्टअप प्रणालीची प्रगती करुन अबुधाबीमधील शैक्षणिक, संशोधनविषयक आणि नवोन्मेष परिसंस्था बळकट करेल असेही प्रधान म्हणाले.

आयआयटी दिल्ली-अबुधाबी संकुल 2024 पासून सुरु होणार

आयआयटी दिल्ली-अबुधाबी संकुल 2024 पासून आपले शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करणार आहे. पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी कार्यक्रम राबवेल तसेच शाश्वत ऊर्जा आणि हवामान अभ्यास तसेच कंप्युटिंग आणि डेटा सायन्स यांच्याशी संबंधित संशोधन केंद्र सुरू करेल, अशी अपेक्षा आहे. आयआयटी दिल्ली- अबुधाबीकडून  ऊर्जा आणि शाश्वतता, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी, गणित आणि कंप्युटिंग आणि अभियांत्रिकी, विज्ञान आणि मानव्य या विषयांचे इतर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातील असे प्रधान म्हणाले.  

महत्त्वाच्या बातम्या:

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Speech Independence Day : युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Embed widget