एक्स्प्लोर
ना जीन्स, ना लेंगा, ना पायजमा! लुंगी भारतात सर्वात फेमस
एक लाख नागरिकांसोबत केलेल्या सर्व्हेत 52 टक्के जणांनी गेल्या वर्षभरात एक लुंगी विकत घेतल्याचं सांगितलं.

नवी दिल्ली : जीन्स-टी शर्ट नाही, सदरा-लेंगा नाही, तर लुंगीला भारतातील सर्वाधिक पुरुषांशी पसंती दिली आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने 2011-12 ची आकडेवारी जारी केली आहे. भारतीय पुरुष लुंगीला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर धोतर आणि कुर्ता-पायजम्याचा क्रमांक लागतो. एक लाख नागरिकांसोबत केलेल्या सर्व्हेत 52 टक्के जणांनी गेल्या वर्षभरात एक लुंगी विकत घेतल्याचं सांगितलं. तर 21 टक्के जणांनी धोतर तर 13 टक्के लोकांनी पायजमा खरेदी केल्याचं सांगितलं. लुंगी आणि धोतर हा पेहराव प्रामुख्याने भारतात दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये केला जातो. उत्तरेकडील राज्यांनी कुर्ता आणि पायजमा या पेहरावाला पसंती दिली. लुंगी परिधान करणाऱ्या राज्यांमध्ये ओदिशाचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, तामिळनाडू यांचा नंबर लागतो. कुर्ता-पायजमा घालणाऱ्यांमध्ये हरियाणा-दिल्ली ही राज्यं अव्वल आहेत.
आणखी वाचा






















