देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


PM Modi : पंतप्रधान मोदींकडून इस्रोच्या प्रमुखांचं विशेष कौतुक, थेट दक्षिण आफ्रिकेतून फोनवरुन साधला संवाद


PM Modi On Chandrayaan 3 Land : बुधवार 23 ऑगस्ट हा दिवस इतिहासामध्ये भारताच्या नावाने लिहिला गेला आहे. संपूर्ण देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आला आणि भारत चंद्रावर पोहोचला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने चांद्रयान -3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅण्डिंग यशस्वीरित्या केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट दक्षिण आफ्रिकेतून फोन करुन इस्रोच्या प्रमुखांना शुभेच्छा दिल्या आहेत. वाचा सविस्तर 


चांद्रयान 3 च्या यशानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा राष्ट्रपती, पंतप्रधानांना संदेश; भारताचं तोंडभरुन कौतुक


Vladimir Putin On Chandrayaan 3 Land : भारताच्या मिशन चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरून इतिहास रचला आहे. यासह चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश ठरला आहे. याच निमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देखील भारताचं कौतुक केलं आहे. पुतिन यांनी म्हटले आहे की, ही ऐतिहासिक घटना वैज्ञानिक-तंत्रज्ञान क्षेत्रात भारताच्या प्रभावी प्रगतीचा पुरावा आहे. वाचा सविस्तर


तेल कंपन्यांकडून आजचे दर जारी, तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ की, घट?


Petrol-Diesel Price Today: भारतीय सरकारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केलेले आहेत. देशातील तेल वितरण कंपन्या दररोज वेबसाईटवर पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत काही बदल झाल्यास कंपन्या ते त्यांच्या वेबसाईटवर अपडेट करतात. 24 ऑगस्टसाठी तेलाच्या नव्या किमती जारी करण्यात आल्या आहेत. 24 ऑगस्टलाही तेलाच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल होईल किंवा होणार नाही, असे कोणतेही संकेत अद्याप केंद्र सरकारकडून देण्यात आलेले नाहीत. वाचा सविस्तर


रशियात विमान कोसळले, वॅग्नर नेते येवगेनी प्रीगोझिन यांच्यासह 10 जणांचा मृत्यू


Russia Plane Crash : रशियाच्या मॉस्को शहराच्या उत्तरेला एका खासगी विमानाचा अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात बंड करणारे वॅग्नर नेते येवगेनी प्रीगोझिन यांचाही यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. येवगेनी प्रीगोझिनच्या मृत्यूचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. हा अपघात मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग दरम्यान घडला आहे. असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार, क्रॅश झालेले विमान प्रीगोझिनचे होते. प्रीगोझिनने जूनमध्ये रशियन सशस्त्र दलांविरुद्ध अयशस्वी बंडखोरी केली. वाचा सविस्तर


मेटाचं प्रगतीच्या दिशेने आणखी एक पाऊल, युनिव्हर्सल ट्रान्सलेटर सेवा लवकरच  होणार सुरु


मुंबई : फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटाने एक नवं फीचर लवकरच सुरु करणार आहेत. व्हॉइस-टू-टेक्स्ट असं हे फीचर असून यामध्ये जवळपास 100 भाषांचे भाषांतर करण्यात येणार आहे. SeamlessM4T असं या मेटाच्या नव्या फीचरचं नाव असणार आहे. तसेच युनिव्हर्सल ट्रान्सलेटर सुरु करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना यश आल्याचं देखील यानिमित्ताने म्हटलं जात आहे. वाचा सविस्तर


मेष, कर्क, धनुसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य


Horoscope Today 24 August 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांचा जोडीदाराशी वाद होऊ शकतो. तर, वृश्चिक राशीच्या लोकांना कुटुंबीयांबरोबर धार्मिक स्थळाला जाण्याची संधी मिळेल. एकूणच मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवार नेमका कसा असेल? काय म्हणतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर


पंतप्रधान मोदी यांचा दक्षिण आफ्रिका दौरा, बारामतीमध्ये अजित पवार यांचा सत्कार होणार; आज दिवसभरात


24th August Headlines : ब्रिक्स देशांच्या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडीसमोर चौकशीला हजर राहणार आहेत. तर, राज्यात राष्ट्रवादीमधील बंडानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती असणार असून त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. वाचा सविस्तर


क्रांतिकारक राजगुरु आणि बहिणाबाई चौधरी यांची जयंती, कोलकाता शहराची स्थापना; आज इतिहासात


24th August In History: आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. शाळेतील पाठ्यपुस्तकांत ज्यांच्या कविता शिकत आणि ऐकत आपण मोठे झालो, ज्यांच्या कवितांमधून जगण्याचे तत्वज्ञान बोली भाषेतून समजले अशा प्रख्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा आज जन्मदिन आहे. स्वातंत्र्यसैनिक शिवराम हरी राजगुरु यांचा जन्म देखील आजच्या दिवशी झाला. तर कोलकाता शहराची स्थापना देखील आजच्याच दिवशी झाली. आजच्या दिवशी घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घटना आजच्या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊया. वाचा सविस्तर