देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील


आजपासून 'नोटबदली' सुरू... जाणून घ्या दोन हजारांची नोटांसंदर्भातील तुम्हाला पडलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशात पुन्हा एकदा नोटबंदी  जाहीर करण्यात आली. पण यावेळी केवल 2 हजार रुपयांच्या नोटा  चलनातून मागे घेण्यात आल्या. तुमच्याकडेही 2000 रुपयांच्या नोटा असतील तर तुम्ही त्या आजपासून 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन बदलून घेऊ शकता. पण बँकेत जाण्यापूर्वी 2 हजारच्या नोटा बदलण्याबाबत जाणून घ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं... (वाचा सविस्तर)


अयोध्येच्या राम मंदिराचं काम वगाने सुरु; 30 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार पहिला टप्पा, बांधकाम समितीच्या अध्यक्षांची माहिती 


 रामजन्मभूमी मंदिराच्या (Ram Mandir) बांधकामाचे काम जोरात सुरू आहे.   राम मंदिराचं (Ram Mandir) किती बांधकाम पूर्ण झालं आहे?  या संदर्भात राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र बांधकाम ट्रस्टचे प्रमुख  नृपेंद्र मिश्रा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराचा पहिला टप्पा 30 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणाार आहे. (वाचा सविस्तर)


 देशातील बहुतांश राज्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे, तर काही भागात पावसाचा इशारा 


आठवडाभर  उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आज दिलासा मिळणार आहे. बुधवारी राज्यासह देशात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने  वर्तवला आहे.   पुढील चार ते पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भात पावसाचा जोर जास्त असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.  (वाचा सविस्तर)


फिजी आणि पापुआ न्यू गिनी नाही तर आतापर्यंत नऊ देशांनी पंतप्रधान मोदींना केले सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजी आणि पापुआ न्यू गिनी देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतर देशांकडून सन्मानित करण्यात आलेली ही पहिली वेळ नाही तर आतापर्यंत नऊ देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान केली आहे.  त्यानंतर देखील पुरस्काराची मालिका सुरूच राहिली (वाचा सविस्तर)


एकाच टेस्टिंग किटद्वारे तब्बल तीन आजारांची चाचणी शक्य; पहिलं स्वदेशी टेस्टिंग किट लॉन्च


पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीनं देशातील नागरिकांना एक मोठी भेट दिली आहे. एनआयव्हीनं  एक थ्री इन वन टेस्टिंग किट शोधून काढलं आहे. या एकाच किटद्वारे एन्फ्लुएंझा ए, बी आणि SARS-CoV-2 अशा तीन संसर्गजन्य आजारांचा शोध घेणं शक्य होणार आहे. हे पहिलं स्वदेशी टेस्टिंग किट आहे, जे एकच किट तीन आजारांची चाचणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. (वाचा सविस्तर)


झोमॅटोवर 2 हजाराच्या नोटांचा पाऊस; कंपनीचं खिल्ली उडवणारं ट्वीट, नेमकं झालंय काय? 


आरबीआयनं 2000 च्या नोटा चलनातून मागे घेत असल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली. लोक घरात ठेवलेल्या 2 हजारांच्या नोटा बदलण्यासाठी गडबड करु लागले आहेत. एरवी सर्रास युपीआय वापरणारेही 2 हजारांच्या नोटांनी व्यवहार करत आहेत. पण यासगळ्या गोंधळात मात्र आरबीआयला नोटा बदलण्यात झोमॅटो  हातभार लावतंय की, काय? असा प्रश्न पडला आहे.  कारण ठरतंय खुद्द झोमॅटोनं केलेलं एक ट्वीट (वाचा सविस्तर)


मेष, धनु, मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस भाग्याचा, आर्थिक लाभही होणार; जाणून घ्या 12 राशींचं आजचं राशीभविष्य 


राशीभविष्यानुसार, आज 23 मे 2023, मंगळवारचा दिवस अत्यंत चांगला आहे. आज मेष राशीच्या लोकांना कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साही असेल, तर तूळ राशीच्या लोकांसाठी व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील, तसेच त्यांनी विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयाचा त्यांना नक्कीच फायदा होईल. मेष ते मीन राशीसाठी मंगळवारचा दिवस कसा राहील? जाणून घ्या तुमच्या राशीनुसार आजचं राशीभविष्य... (वाचा सविस्तर)


पश्चिम जर्मनीची स्थापना, माजी क्रिकेटपटू माधव मंत्री, संगीतकार आनंद मोडक यांचे निधन; आज इतिहासात 


 इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. आजच्या दिवशी दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीची फाळणी झाली आणि पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी अशी स्थापना झाली. तर, भारताचे माजी क्रिकेटपटू माधव मंत्री आणि संगीतकार आनंद मोडक यांचे निधन आजच्या दिवशी झाले.  (वाचा सविस्तर)