Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust: उत्तर प्रदेशातील अयोध्येत (Ayodhya) उभारण्यात येत असलेल्या रामजन्मभूमी मंदिराच्या (Ram Mandir) बांधकामाचे काम जोरात सुरू आहे.   राम मंदिराचं (Ram Mandir) किती बांधकाम पूर्ण झालं आहे?  या संदर्भात राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र बांधकाम ट्रस्टचे प्रमुख  नृपेंद्र मिश्रा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराचा पहिला टप्पा 30 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणाार आहे.


नृपेंद्र मिश्रा म्हणाले, मंदिराची निर्मिती तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर भक्तांना राम लल्लाच्या दर्शनासाठी मंदिराती प्रवेश मिळणार आहे. एएनआय या वृत्त संस्थेला माहिती देताना मिश्रा म्हणाले, पहिल्या टप्प्यात ग्राउंड फ्लोअरचे पाच मांडव पूर्ण करण्यात येणार आहे.


30 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार पहिला टप्पा


मिश्रा म्हणाले, 30 डिसेंबर 2023 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याच निर्णय ट्रस्टने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ग्राउंड फ्लोअरचे पाच मांडव पूर्ण करण्यात येण्यार आहे. यामध्ये एक प्रमुख गर्भगृह असणार ज्यामध्ये भगवान रामाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. 


या पाच मांडवाच्या निर्मितीसाठी जवळपास 160 खांब असणर आहे. तसेच आयकॉनोग्राफीचे काम देखील लवकर पूर्ण कण्यात येणार आहे. मंदिराच्या सर्वात खालच्या भागात भगवान रामाच्या दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणर आहे. तसेच वीज, पाणी या सारख्या इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणर आहे. ही सर्व कामे 30 डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.






30 डिसेंबर 2024 दुसरा टप्पा पूर्ण होणार


मंदिराच्या दुसऱ्या टप्प्याविषयी माहिती देताना नृपेंद्र मिश्रा म्हणाले, मंदिराचा पहिला आणि दुसरा मजला 30 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. भगवान रामाची मूर्तीची स्थापना या वर्षाखेरपर्यंत करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यापासून राम लल्लाचे दर्शन राम भक्तांना घेता येणार आहे


या वर्षाखेरपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. संपूर्ण मंदिराचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार या प्रश्नाला उत्तर देताना समिती प्रमुख नृपेंद्र मिश्रा म्हणाले, डिसेंबर 2025 पर्यंत संपूर्ण मंदिराचे काम पूर्ण होणार आहे.


हे ही वाचा :


Ayodhya Ram Mandir: 'या' चमत्कारी दगडापासून बनणार प्रभू रामाची मूर्ती, राम मंदिराचे काम प्रगतीपथावर